लग्नाच्या ६ महिन्यातच अभिनेत्री रेखा ‘विधवा’ झाली होती, पती मुकेशसोबत अशी झालेली तिची प्रेमकहाणी सुरू….
बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखाने जरी वयाची ६० वर्षे ओलांडली आहेत, परंतु तिच्या सौंदर्यासमोर २५ वर्षांची अभिनेत्रीदेखील दिसायला फिकी पडेल. रेखाची कांजीवरम साडी, लहरणारे केस, गडद मेकअप आणि जड दागदागिने, गडद लिपस्टिक यामुळे सर्वांचे लक्ष ती आकर्षून घेते.

रेखा भले ही चित्रपटांपासून आता थोडी दूर झालीय, पण जेव्हा जेव्हा ती एखाद्या कार्यक्रमाला जाते तेव्हा तेव्हा अजूनही सर्व कॅमेरे तिच्याकडेच वळतात. रेखाची चित्रपटातील कारकीर्द खूप चांगली झाली आहे, पण तिच्या वास्तविक जीवनात बरेच उतार-चढाव पाहायला मिळाले आहेत. आत्तापर्यंत रेखाचे नाव अनेक लोकांशी जोडले गेले आणि तिचे लग्नही झाले होते. पण आजही रेखा एकटी आहे. १९९० मध्ये रेखाचे उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न झाले आणि सहा महिन्यांनंतर लगेचच तिच्या पतीने आ’त्मह’त्या केली होती.

रेखानेच घेतला होता पुढाकार
रेखाच्या बायोपिक द अनटोल्ड स्टोरीमध्ये रेखा आणि पती मुकेश अग्रवाल यांच्यातील नात्याबद्दल सविस्तर वर्णन केले आहे. त्या दिवसांत रेखा बहुतेक वेळा तिची मैत्रीण फॅशन डिझायनर बीना रामानीला भेटायला दिल्लीला जात असे.

रेखा अश्या एका व्यक्तीच्या शोधात होती जो तीच्यावर प्रेम करेल. रेखाच्या इच्छेविषयी माहिती असलेल्या बीना रमानी यांनी एकदा तिला मुकेश अग्रवाल यांचा नंबर दिला. तसेच हे पण सांगितले की ते तुझे खूप मोठे चाहतेही आहेत व दिल्लीचे मोठे व्यवसायिकही. पण रेखाने मुकेशला आपला नंबर देण्यास नकार दिला.

त्याकाळी मोबाईल फोन नव्हते पण लँडलाईन होते परंतू रेखाला मुकेशला कॉल करायचा नव्हता. बीना रामानीच ऐकून रेखाने स्वतःहून मुकेशला फोन केला होता.

पहिली भेट
रेखाने पहिलं पाऊल टाकल्यानंतर पहिल्यांदाच दोघांची चर्चा खूप सामान्य झाली आणि मुकेशला बरेच आश्चर्य वाटले. कारण एका सुपरस्टारने त्याला बोलावलं होत. फोनवर संभाषणानंतर एक महिन्यातच दोघे मुंबईत प्रथमच भेटले आणि रेखाने मुकेश अग्रवालकडे टक लावून पाहिलं व तिला तो पहिल्या भेटीतच आवडला कारण मुकेश एक प्रामाणिक आणि अगदी साधा माणूस होता.

अचानक मंदिरात लग्न
मुकेश अग्रवाल रेखावर प्रेम करीत होते आणि रेखालाही ते आवडू लागले. अनेक भेटींनंतर एके दिवशी मुकेशने रेखाला मुंबईत लग्नासाठी विचारले आणि रेखानेही यावर सहमती दर्शविली. मार्च १९९० मध्ये जुहूच्या एका मंदिरात दोघांनी लग्न केले. लग्नाच्या एक महिन्यानंतर दोघांनी तिरुपती मंदिरात लग्नाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यात रेखाचे आई-वडीलही हजर होते. कुटुंब आणि मित्रांची भेट घेतल्यानंतर हे दोघे ह’नि’मूनसाठी लंडनला गेले.

लग्नानंतरही अलिप्त राहिले होते
दोघेही एकमेकांवर नक्कीच प्रेम करत होते पण काही कारणास्तव वेगळे राहत होते. लग्नानंतरही रेखा चित्रपटातील कामासाठी मुंबईत राहत होती आणि मुकेश दिल्लीत कारण त्यांचा व्यवसाय तिथे होता. सर्व काही व्यवस्थित चालू होते. परंतु लग्नाच्या काही महिन्यांनंतर मुकेशला व्यवसायामधे खूप नुकसान सहन करावे लागले.

यामुळे रेखा चिंताग्रस्त राहू लागली आणि ती मुकेशला भेटायला दिल्लीला वरचेवर जायची. पण रेखाने आपल्यासोबतच रहावे आणि चित्रपट थांबवावेत अशी मुकेशची इच्छा होती. या सर्व गोष्टींमुळे अ’स्वस्थ होऊन मुकेश गंभीर मा’न’सि’क ताणतणावात गेला आणि त्याने औषधे घेणं सुरू केलं. एक वेळ अशी आली की प्रेमाच्या नात्यात इतके अंतर आले की दोघांचेही फोनवर बोलणे बंद झाले.

सहा महिन्यांनंतर घटस्फो’टासाठी अर्ज
आयुष्यातील या गोंधळाला कंटाळून रेखाने घटस्फो’टासाठी अर्ज दाखल केला आणि घटस्फो’टाच्या अर्जाने त्यांना मोठा धक्का बसला. हवे असूनही ते त’णावा’तून मुक्त होऊ शकले नाही आणि नंतर ती वेळ आली जेव्हा त्यांनी ऑक्टोबर १९९० मध्ये पत्नी रेखाच्या ओढणीने ग’ळफा’स लावून आ’त्मह’त्या केली, आणि स्वतःच आयुष्य संपवलं कायमच…

अशा प्रकारे त्यांच्या प्रेमाचा दुःखद अंत झाला. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेलेलं की मुकेशच्या मृ’त्यूचे कारण रेखा होती आणि मुकेशच्या आईने मुलाच्या मृ’त्यूनंतर रेखाला रागात हड’ळ म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.