लिहिता वाचता येत नसूनही उत्कृष्ट अभिनय कशी करते ही चिमुकली,बघा शूटिंग चा विडिओ!!

नमस्कार मित्रांनो, माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका नुकतीच झी मराठी या वाहिनीवर सुरू झाली आहे. आणि बघता बघता ही मालिका लोकप्रिय देखील झाली. या मालिकेतील सर्वांची लाडकी परी म्हणजेच बालकलाकार मायरा वैकुळ ही तिची शूटिंग कशी करते याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. कारण मायराला अजून वाचताही येत नाही ती तिची स्क्रिप्ट कशी वाचते आणि तिला सर्वजण कसे समजून सांगतात याबद्दल आपण माहिती बघणार आहोत.

झी मराठी या वाहिनीवर सुरू असलेली माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेद्वारे अनेक वर्षानंतर अभिनेता श्रेयस तळपदे छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. श्रेयश या मालिकेमध्ये यश या भूमिकेमध्ये दिसत आहे.

तसेच या मालिकेमध्ये त्याच्यासोबत प्रार्थना बेहेरे ही नेहा कामत ही भूमिका साकारताना दिसत आहे. मालिकेत दिग्गज कलाकारांची फौज असताना मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतेय ती म्हणजे बालकलाकार मायरा… मायरा हीने मालिकेत परीची भूमिका साकारली आहे. मायरा ही सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते.

ती सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी पोस्ट करत असते. तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती अभिनयाची प्रॅक्टिस करताना दिसत आहे. याबाबत अनेकांनी तिला प्रश्न विचारले होते. माहेराला ज्यावेळी शूट करायचा असतो त्यावेळी ती मदत घेत असते.

सुरुवातीला मालिकेचा दिग्दर्शक तीला तिचा सिन काय आहे हे समजून सांगतो. तीला प्रार्थना आणि श्रेयश हे देखील तिचा सीन समजावून सांगण्यात मदत करतात. त्यानंतर ती स्वतःला काय डायलॉग म्हणायचे आहेत ती ती पाठ करते. मायरा तिचे संवाद कधीच सेटवर विसरत नाही.

विडिओ इथे पहा

निरागस अभिनयाने तिने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर आधीच स्टार ठरलेली चिमुकली मायरा मालिकेच्या एका एपिसोड साठी तब्बल दहा हजार रुपये मानधन घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.