विभक्त होण्याच्या बातम्यांदरम्यान प्रियांकाने सर्वांसमोर केले असे काही,की चाहते झाले थक्क!!

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने नुकत्याच एका व्हिडिओमध्ये तिचा पती निक जोनस आणि त्याच्या भावंडांना रोस्ट केले आहे. यादरम्यान तीने अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वास्तविक, जोनस ब्रदर्सला रोस्ट करणारा ‘द जोनस ब्रदर्स फॅमिली रोस्ट’ हा शो नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये प्रियांका चोप्रा नुकतीच पोहोचली होती. यादरम्यान तीने निकसह त्याच्या भावांची खिल्ली उडवली, जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रियांका चोप्रा स्टेजवर उभी असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. जोनस ब्रदर्स एका कोपऱ्यात सोफ्यावर बसलेले आहेत, आणि मोठ्या संख्येने प्रेक्षकही तेथे उपस्थित आहेत. प्रियंका म्हणते की, मी खूप सन्मानित आणि उत्साहित महसुस करत आहे, आज रात्री माझा पती निक जोनस आणि त्याचे भाऊ यांना रोस्ट करूनही, त्यांची नावे मला कधीच आठवत नाहीत. मी भारतातील आहे, भारत एक समृद्ध संस्कृती, संगीत आणि मनोरंजन असलेला देश आहे, त्यामुळे हे स्पष्ट आहे की तो जोनस ब्रदर्ससाठी बनवलेला नाहीये.”

यावेळी प्रियांका चोप्रा तिच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल बोलताना म्हणाली, “निक आणि माझ्यामध्ये 10 वर्षांचा फरक आहे. होय, त्याला 90 च्या दशकातील पॉप संस्कृतीची बरीच उदाहरणे समजत नाहीत आणि मी त्याला ते समजावून सांगेन. हे देखील ठीक आहे, कारण आम्ही दोघे एकमेकांना शिकवतो. तो मला Tik Tok कसा वापरायचा हे शिकवतो आणि मी त्याला शिकवते की यशस्वी अभिनय करिअरसाठी काय करावे लागते.”

प्रियांकाच्या या रोस्टिंगवर उपस्थित प्रेक्षक हसतात. त्याचवेळी अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती बऱ्याच दिवसांनी बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. ज्यामध्ये फरहान अख्तरचा ‘जी ले जरा’ हा चित्रपट अभिनेत्रीचा आगामी प्रोजेक्ट असणार आहे. या चित्रपटात अभिनेत्रीसोबत आलिया भट्ट आणि कटरीना कैफ दिसणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.