आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चां चालू असतानाच आता झाला मोठा खुलासा, अभिनेत्री फातिमा सोबत फोटो झाले वायरल!!

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ ही पदवी मिळालेल्या आमिर खानने एकापेक्षा एक सरस चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. त्याचा अभिनय लोकांना खूप आवडतो. तो त्याच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमुळे चर्चेत असला तरी यावेळी तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेता आमिर खानने दोन लग्न केले आहेत. सध्या त्याचा घटस्फोट झाला आहे.

विभक्त झाल्यानंतर दोघांनी संयुक्त निवेदन जारी केले आहे. ज्यात त्यांनी लिहिले आहे की, आता आम्ही पती-पत्नी नाही. आम्ही सह-पालक म्हणून कुटुंब आहोत. त्यानंतर अभिनेत्याच्या तिसऱ्या लग्नाच्या बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. बातम्यांनुसार, आमिर तिसऱ्यांदा लग्न करणार आहे. अभिनेता आमिर खानबद्दल असा दावा केला जात आहे की, आमिर अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत लग्न करू शकतो.

आमिर खान आणि फातिमा सना शेख यांची नावे सतत एकमेकांशी जोडली जात आहेत. हे दोघेही बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. प्रसिद्ध कलाकार फातिमा सना शेख आमिरसोबत त्याच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ आणि ‘दंगल’ या दोन चित्रपटांमध्ये दिसली होती. मात्र आता त्याचे नाव आमिर खानसोबत जोडले जात आहे. दुसरीकडे, ही अफवा असल्याचा दावाही केला जात आहे.

अभिनेता आमिर खानच्या एका जवळच्या सहाय्यकाने सांगितले आहे की, “त्याच्या तिसऱ्या लग्नाच्या बातम्या खोट्या आहेत. तो असे अजिबात करू शकत नाही.” असे म्हटले जात आहे की, त्याचा आगामी चित्रपट “लाल सिंग चड्ढा” रिलीज झाल्यानंतर तो त्याच्या तिसऱ्या लग्नाची घोषणा करेल. आमिरचा आगामी चित्रपट “लाल सिंग चड्ढा” एप्रिल 2022 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. दरम्यान, फातिमा सना शेखचे वक्तव्य समोर आले आहे. ज्यामध्ये तिने काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

एका मुलाखतीदरम्यान याबद्दल बोलताना ती म्हणाली आहे की, हे खूप विचित्र आहे, “माझी आई हे सर्व टीव्हीवर पाहायची. मग एके दिवशी वर्तमानपत्रात माझा फोटो पाहून ती म्हणाली, बघ तुझा फोटो आला आहे. मग मी म्हणायचे काय लिहिलंय? त्यानंतर हे सर्व ऐकून मी खूप अस्वस्थ व्हायचे. तेव्हा मला वाटले की माझे म्हणणे सर्वांसमोर मांडावे. तिचे म्हणणे आहे की, लोकांचेे बोलायचे काम आहे, तर ते बोलतीलच….

आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्तसोबत झाले होते. पण त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2002 मध्ये दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर आमिर खानने किरण रावसोबत लग्न केले, पण त्यांचे लग्न टिकू शकले नाही आणि दोघेही वेगळे झाले. आता या अभिनेत्याचे नाव अभिनेत्री फातिमा सना शेख हिच्यासोबत जोडले जात आहे. मात्र, यात किती तथ्य नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published.