23 वर्षांपूर्वी गायब झाली होती अक्षयची बहीण, आता घटस्फोटित पुरुषासोबत कमावतेय करोडो रुपये…

अक्षय कुमारने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे. आज आम्ही तुम्हाला अक्षयच्या एका नायिकेबद्दल सांगणार आहोत जी अचानक एक दिवस गायब झाली होती आणि काही वर्षांनी करोडो रुपयांची मालकिन बनली आणि सर्वांसमोर आली. 1992 मध्ये ‘जान तेरे नाम’ हा सुपरहिट चित्रपट आला होता. आम्ही या चित्रपटाची अभिनेत्री फरहीन बद्दल बोलत आहोत.

1994 मध्ये फरहीन ‘नजर के सामना’ चित्रपटात अक्षय कुमारसोबत रोमान्स करताना दिसली होती. याआधी तिने ‘सैनिक’ चित्रपटात अक्षयच्या बहिणीची भूमिकाही साकारली होती. फरहीनचा चेहरा बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितशी मिळता जुळता आहे. यामुळेच तीच्या चाहत्यांची संख्या अचानक वाढू लागली. त्यानंतर फरहीन बॉलीवूडमध्ये एक प्रसिद्ध नाव बनू लागली.

पण त्यानंतर 1997 मध्ये तिने भारतीय क्रिकेटर मनोज प्रभाकरसोबत लग्न केले. लग्नानंतर फरहीनने बॉलिवूड करियर सोडले आणि ती चित्रपटसृष्टीतून गायब झाली. लग्नानंतर फरहीनने फिल्म लाइन सोडली आणि पती मनोज प्रभाकरसोबत दिल्लीत स्थायिक झाली. मनोजला आधीच संध्या नावाची बायको होती.

जेव्हा फरहीन मनोजच्या आयुष्यात आली तेव्हा त्याने पत्नी संध्याला सोडले आणि फरहीनसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला. मनोजची पत्नी संध्याच्या म्हणण्यानुसार, दोघेही 6 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहिले होते. मनोज तिचा मानसिक छळ करत असल्याचा आरोपही संध्याने केला आहे. शेवटी फरहीनमुळेच मनोज आणि संध्याचा घटस्फोट झाला होता. फरहीनने घटस्फोटापूर्वी मनोजशी गुपचूप लग्न केल्याच्या बातम्याही आल्या होत्या.

बॉलिवूड सोडून मनोजशी लग्न केल्यानंतर फरहीनने ‘नॅचुरन्स हर्बल्स’ नावाची कंपनी उघडली. ती या कंपनीत संचालक आहे. या कंपनीचा हर्बल स्किन केअर उत्पादनांचा व्यवसाय आहे. फरहीन पती मनोज प्रभाकरसोबत हा व्यवसाय चालवते. फरहीन ही कंपनी गेली 18 वर्षापासून चालवत आहे, जीची वार्षिक उलाढाल कोटींमध्ये आहे.

1973 मध्ये चेन्नईतील एका तामिळ मुस्लिम कुटुंबात जन्मलेली फरहीन 47 वर्षांची झाली आहे. तीला राहिल आणि मानवंश ही दोन मुले आहेत. याशिवाय ती मनोजची पहिली पत्नी संध्याचा मुलगा रोहनचीही काळजी घेते. फरहीनने अक्षय कुमारसोबत ‘सैनिक’ (1993) आणि ‘नजर के सामने’ (1994) मध्ये काम केले आहे.

याशिवाय ती आग का तुफान, दिल की बाजी, तहकीकत, फौज, अमानत आणि साजन का घर या चित्रपटांमध्येही दिसली आहे. साजन का घर हा तीचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट होता. फरहीनने यापूर्वी कन्नड चित्रपट ‘हल्ली मेशत्रू’ आणि तमिळ चित्रपट ‘कलईगनन’ मध्ये काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.