सलमान खानचे नाव बॉलिवूडमधील अनेक मुलींशी जोडले गेले आहे, मग ती संगीता बिजलानी असो किंवा सोमी अली किंवा ऐश्वर्या राय. पण कोणीही विचार केला नसेल कि, सलमान खान जुही चावला शी लग्न करू इच्छित होता.
जुही चावलाने सलमान खानसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांच्या अफेअरच्या बातम्या कधीच समोर आल्या नाहीत. सलमान जुहीशी लग्न करू इच्छित होता आणि अगदी जुहीच्या वडिलांकडेही मदत मागत असे. याचा खुलासा खुद्द सलमान खानने त्याच्या चॅट शोमध्ये केला होता.
सलमान खान म्हणाला होता की, ‘जुही खूप गोड आहे. मी तीच्या वडिलांना विचारले होते की ती माझ्याशी लग्न करेल का? पण त्यांनी नकार दिला. सलमान आणि जुहीने कधीही कोणत्याही चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या नाहीत. सलमान खानला याबाबत विचारले असता तो म्हणाला होता की, “जुहीला माझ्याबरोबर काम करायला आवडत नव्हते.”
तसेच जुही चावलाचे नाव कोणत्याही अभिनेत्याशी जोडलेले नाही कारण ती करिअरच्या सुरुवातीला जय मेहताला भेटली होती. आणि जय आधीच विवाहित होता, परंतु त्याच्या पत्नीचा विमान अपघातात मृत्यू झाला. दरम्यान, पत्नीच्या मृत्यूमुळे त्याला खूप मोठा धक्का बसला होता.