अमिताभ बच्चन पासून अक्षय कुमार पर्यंत; या बॉलिवूड स्टार्सकडे आहेत आलिशान खाजगी जेट, पहा आतील फोटो..

बॉलिवूड सेलेब्स अनेकदा सोशल मीडियावर आलिशान घरांपासून ते खाजगी विमानांपर्यंत त्यांच्या स्वतःच्या गोष्टी दाखवण्याची एकही संधी सोडत नाहीत. शाहरुख खानचे म्हणने आहे की त्याच्याकडे खाजगी जेट नाहीये, पण काही सेलेब्स असे आहेत ज्यांच्याकडे केवळ खाजगी जेटच नाही तर त्यांना आलिशान जीवन जगणे आवडते.

अजय देवगण
अहवालांनुसार, अजय देवगणकडे हॉकर 800 विमान आहे जे सहा सिटर जेट आहे. अभिनेता सहसा प्रमोशनल इव्हेंट्स आणि शूटिंगसाठी याचा वापर करतो.

अक्षय कुमार
भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी अक्षय कुमारकडे 260 कोटी रुपयांचे खासगी जेट आहे. या अभिनेत्याला राजासारखे आयुष्य जगायला आवडते.

अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन क्वचितच विमानतळाला भेट देतो कारण तो अनेकदा त्याच्या खाजगी विमानात प्रवास करतो. अभिषेक बच्चनने काही वर्षांपूर्वी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यावर बिग बीच्या फॅन्सी विमानाची एक झलक शेअर केली होती.

प्रियंका चोप्रा जोनस
प्रियंका चोप्रा जोनास एक ग्लोबेट्रोटर आहे. अभिनेत्री अनेकदा तिच्या कामासाठी आणि पर्सनल कमींटमेंटसाठी भारतातून न्यूयॉर्क किंवा लंडनला जाते. तसेच ही अभिनेत्री खासगी विमानात प्रवास करणे पसंत करते.

शिल्पा शेट्टी कुंद्रा
शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि तिचा पती राज कुंद्रा भव्य जीवन जगतो. त्याच्याकडे जगाच्या अनेक भागात मालमत्ता आहे आणि त्याच्याकडे स्वतःचे खासगी जेट देखील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.