रेखाचे तसले वर्तन पाहून अमीर खानाने रेखा सोबत काम न करण्याची घेतली होती शप्पत!!

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमीर खानचा बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांच्या यादीत समावेश आहे. आमिरने त्याच्या चित्रपटांमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यात ‘3 इडियट्स’, ‘दंगल’ आणि ‘तारे जमीन पर’या सारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. तसेच त्याने अनेक बॉलिवूड सेलेब्ससोबत देखिल काम केले आहे.

प्रत्येकाला माहित आहे की रेखा तिच्या काळातील एक उत्तम अभिनेत्री आहे. तिचा अजूनही चित्रपटसृष्टीत खूप प्रभाव आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने लोकांमध्ये विशेष ओळख आणि एक स्थान निर्माण केले आहे. तसेच तीला बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांसह जोडले गेले आहे. रेखा ने अनेक अभिनेत्यांसोबतही काम केले आहे, पण आमिर खानचे नाव त्यात समाविष्ट नाहीये. दोन्ही कलाकार कधीच पडद्यावर एकत्र दिसले नाहीत.

अहवालांवर विश्वास ठेवला तर, आमिर खान रेखासोबत काम करण्यात कधीच रुचीपूर्ण राहिलेला नाही. असेही म्हटले जाते की शूटिंगच्या सेटवर रेखाचे वर्तन, ती लोकांशी ज्या पद्धतीने वागते, ते आमीर खानला अजिबात आवडत नाही. रेखा ने आमिर खानचे वडील ताहिर हुसेन सोबत काम केले आहे. वडील आणि रेखा यांंचा ‘लॉकेट’ या चित्रपटा दरम्यान आमिर सेट वर जात असे. आणि आमिरला रेखाचे हे वर्तन सेटवरच पाहायला मिळाले होते.

त्याचवेळी, आमिरने रेखासोबत कधीही काम न करण्याचे वचन घेतले होते. असेही म्हटले जाते की, आमिर खानला रेखाची कार्यशैली आवडत नव्हती. तो तिच्या शैलीवर खूप नाखूष होता. सेटवर उशिरा येणे हे रेखाचे खूप वाईट वर्तन होते. अशा परिस्थितीत आमिरला असे वाटत असे की, रेखा कामासाठी समर्पित नाहीये. यामुळे आमिरने रेखासोबत कधीच काम केले नाही.

मात्र, आमिर खानने त्याच्या टाइम मशीन’ या प्रोजेक्ट अंतर्गत नसीरुद्दीन शाह आणि रेखा यांच्यासोबत काम करण्याचा विचार केला होता, पण बजेटमुळे चित्रपट कधीच सुरू होऊ शकला नाही. आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच त्याचा आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्डा’ मद्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर खान देखील दिसणार आहे.

हा हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ चा हिंदी रिमेक आहे. तसेच हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्स या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता. लाल सिंह चड्ढा हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज होणार होता, पण लॉकडाऊनमुळे शूटिंग पूर्ण होऊ शकले नाही. आता हा चित्रपट पुढील वर्षी रिलीजसाठी निश्चित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.