1 लग्न आणि 5 अफेअर्स राहून सुद्धा ही सुप्रसिद्ध अभिनेत्री जगतेय एकाकी आयुष्य.. आजही आहे खऱ्या प्रेमाच्या शोधात..

आपल्या बॉलिवूडमधील चित्रपटांची कथानके जितकी मनोरंजक असतात, काही बॉलिवूड कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य देखील तितकेच मनोरंजक असते. बॉलिवूडमध्ये आपल्याला अनेक अभिनेते-अभिनेत्रींच्या अफेअरच्या बातम्या मिळत राहतात. त्यातील काही तर खूप रोमांचक असतात.

पण ही गोष्टही तितकीच खरी आहे की बॉलिवूड मध्ये जितक्या लवकर जोड्या जमतात, तितकीच लवकर अनेक जोड्या तुटतात देखील. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीची एक रंजक कहाणी सांगणार आहोत जिचे वैयक्तिक आयुष्य बॉलिवूड मध्ये कायम चर्चेचा विषय राहिलेलं आहे.आणि ते ही तिच्या प्रेम प्रकरणांमुळे..

आपण बोलत आहोत ती 1990 च्या काळातील सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा बेदी बद्दल. प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार, पूजा बेदी हीचा जन्म 11 मे 1970 रोजी झाला होता. पूजाच्या वडिलांचे नाव कबीर बेदी असून ते चित्रपटसृष्टीत एक सुप्रसिद्ध अभिनेता राहिले आहेत. पूजाची आई प्रतिमा बेदी ही भारतीय शास्त्रीय नर्तिका होती.

पूजाच्या फिल्मी करिअर मध्ये मात्र कायम चढ उतार येत राहीले. तिचे काही चित्रपट हिट झाले आणि तिच्या बऱ्याच चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले देखील. परंतु बिनधास्त निर्दोष शैली, दिलखुलासवक्तव्य आणि वैयक्तिक आयुष्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. पूजा बेदीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात आमिर खानच्या ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटाद्वारे केली होती. पूजा बेदी बद्दल तुम्हाला हे जाणून फार आश्चर्य वाटेल की 47 वर्षांची पूजा आतापर्यंत 5 लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण आजपर्यंत पूजाला योग्य जीवनसाथी सापडला नाही, ज्यामुळे पूजा अजूनही अविवाहित आहे. तर चला आज जाणून घेऊयात की त्या पाच लोकांबद्दल ज्यांच्याबरोबर पूजा आतापर्यंत रिलेशनशिपमध्ये राहिलेली आहे.

आदित्य पांचोली: सर्व प्रथम या यादीमध्ये जर कुणाचं नाव असेल तर ते म्हणजे अभिनेता आदित्य पांचोली चे. आपल्या वक्तव्यामूळेअनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आदित्य पंचोली यांची पूजा सोबत चांगलीच मैत्री झाली होती. आदित्य पंचोलीचे जरीना बहाव यांच्याशी आधीच लग्न झाले होते. परंतु असे असूनही आदित्य आपल्या विवाहित जीवनात आनंदी नव्हता. पण आदित्य-पूजा मात्र त्यांच्या नात्यात सुखी होते. नंतर पूजाच्या 15 वर्षांच्या मेडने तिला सांगितले की आदित्यने चित्रपटात भूमिका द्यायचे स्वप्न दाखवून तिचा लैं-गि-क छळ केला होता. पूजा बेदी हिला या प्रकरणाची माहिती मिळताच तिने आदित्य पंचोलीशी असलेले संबंध तोडले.

फरहान फर्निचरवाला: आदित्य पांचोलीपासून वेगळी झाल्यानंतर पूजा अनेक वर्षे एकटी राहिली. त्यानंतर 1990 मध्ये पूजाने फरहान इब्राहिम फर्निचरवालाशी लग्न केले. या लग्नापासून त्यांना दोन मुले आहेत. फरहान आणि पूजा वर्ष 2003 मध्ये विभक्त झाले.

हनिफ हिलाल: फरहान फर्निचरवालापासून घटस्फोट घेतल्यानंतर पूजा बेदी पुन्हा प्रेमात पडली. पूजा कोरिओग्राफर हनीफ हिलालला डेट करायला लागली. ज्यांच्यासमवेत तीने ‘नच बलिये 3’ मध्ये जोडीदार म्हणून भाग घेतला होता.

द्विती विक्रमादित्य: हनीफ हिलालसोबत ब्रेकअप झाल्यानंतर पूजा बेदी यांचे द्विती विक्रमादित्यबरोबरही संबंध होते. या दोघांनि लग्न करण्याचीही योजना आखली होती. पण द्विती विक्रमादित्यच्या कुटुंबियांनी साफ नकार दिला. जवळपास दोन वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

आकाशदीप सेहगल: बिग बॉस सीझन 5 मध्ये पूजा आणि आकाशदीपच्या अफेअरच्या बातम्या आल्या आणि शो संपल्यानंतर त्यांचे नाते अधिक दृढ झाले. इतकेच नव्हे तर अभिनेत्याने पूजाचे नावही तिच्या बायसेप्सवर टॅटू करुन घेतले होते, त्यासोबतच त्यांच्या नात्यांची अधिकृत घोषणाही झाली होती. तथापि,त्याचे आणि पूजाचे हे नातंही फार काळ टिकू शकले नाही आणि पूजा त्याच्यापासून विभक्त झाली.

Leave a Reply

Your email address will not be published.