बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान बर्याचदा चर्चेत असतो. पण आजकाल सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली चर्चेत आहे. 90 च्या दशकात सलमान खान आणि अभिनेत्री सोमी अलीच्या अफेअरची सर्वत्र चर्चा होती. आता पुन्हा एकदा अभिनेत्री सोमी अली चर्चेत आली आहे आणि तिने तिच्याबद्दल आणि सलमानच्या नात्याबद्दल आणि करिअरविषयी बर्याच गोष्टी बोलल्या आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सोमी अलीने बर्याच गोष्टी बोलल्या आहेत आणि भारतात येण्याविषयी सांगितले आहे की, ‘मी वयाच्या 16 व्या वर्षी सलमान खानचा चित्रपट’ मैने प्यार किया पाहिला होता आणि मला वाटले की मी या माणसाशी लग्न केले पाहिजे. . मी माझ्या आईला सांगितले की मी उद्या भारतात जाणार आहे.
तिने जिद्दीने आईसमोर आग्रह धरला. तिचे नातेवाईक मुंबईत होते. त्यांना भेटण्याच आणि ताजमहाल पाहण्याच्या निमित्त म्हणून तिने भारतात जाण्यास आई वडिलांची परवानगी घेतली. त्यानंतर काही दिवस पाकिस्तानात राहिल्यानंतर ती मुंबईत पोहोचली.
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘मुंबईत आल्यानंतर मी पोर्टफोलिओ शॉट केला आणि एका प्रोडक्शन हाऊस मध्ये गेले जिथे सलमान होता. नंतर मला बोलावण्यात आले. मला ‘बुलंद’ या चित्रपतासाठी कास्ट करण्यात आले होते पण हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही, यामुळे मला बऱ्याच चित्रपट मिळू लागले.
सोमी पुढे म्हणाली, ‘दिग्दर्शक मला घाबरत होते, मी प्रॅक्टिस ला जात नव्हते. माझी जीवनशैली वेगळी होती. मी येथे चित्रपटांमध्ये करिअर करण्यासाठी आले नव्हती, मला फक्त सलमान खानशी लग्न करायचे होते. अभिनेत्रीने सांगितले की, ‘जेव्हा ती मुंबईत राहिली होती तेव्हा तिने अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेता चंकी पांडेरख्या बर्याच चांगल्या अभिनेत्यासोबत काम केले होते.
सोमी अली सलमान खानला भेटली होती आणि तीने सलमानला डेट करण्यास देखील सुरवात केली. मग काही कारणास्तव १९९९.मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. सलमानबरोबरचे संबंध संपल्यानंतर सोमी पुन्हा अमेरिकेत अभ्यासासाठी गेली. सोमी म्हणाली, बरेच वर्ष झाले मी सलमान खानशी काही बोलले नाही.
बर्याच वेळा लोक आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळते काय करावे आणि काय करू नये. एक वेळ अशी पण येते जेव्हा आयुष्यात आपण पुढे जायला हवं.असं म्हणतात की अभिनेत्री ऐश्वर्या राय सलमान खानच्या आयुष्यात आली आणि म्हणून सोमीने सलमान सोबत ब्रेकअप केला.