लग्नानंतरही या अभिनेत्याचे होते अफेअर, बायकोनेच प्रेयसीसोबत पकडले होते रंगेहाथ !

अभिनेता अक्षय कुमारला बॉलीवुडचा खिलाडी नंबर वन असं म्हटलं जातं. त्याचा अभिनय, कॉमेडीचं टायमिंग यासह त्यांच्या स्टंट्सचे सारेच फॅन आहेत. एक हरहुन्नरी अभिनेता असण्यासोबतच अक्की एक आदर्श पती आणि आदर्श पिताही आहे. वैयक्तीक जीवनातही अक्षय एक उत्तम आणि आदर्श पती आहे.

अभिनेत्री ट्विंकल खन्नासह त्याचा सुखी संसार सुरु आहे. दोघांचंही एकमेंकांवर जीवापाड प्रेम आहे. चित्रपटसृष्टीत दिवसागणिक नाती कशी बदलतात हे सांगणं कठीणच आज रिलेशनशिपमध्ये असणारे कपल उद्या एकत्र दिसतीलच असं नाही. त्यामुळेच कितने अजीब रिश्ते है यहाँ पे या गाण्याच्याओळी सेलिब्रिटींसाठी तंतोतंत लागू पडतात.

बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारचेही अनेक अभिनेत्रींसोबत अफेर गाजले होते. यात प्रियंका चोप्रासह त्याचे अफेअरने तर पत्नी ट्विंकल खन्नाचीच झोप उडवली होती. दिवसेंदिवस अक्षय कुमारचे प्रियंकोसोबत जवळीक वाढु लागल्याचे ट्विंकला समजले होते. त्यामुळे अक्षय प्रियंकापासून लांब कसा राहिली याकडेच ती खास लक्ष देत असे.

मात्र तरीही काहीही केल्या हे शक्य होत नव्हते. एके दिवशी हे तिघेही एका पार्टीत गेले होते. तिथे अक्षय कुमारचे प्रियंकासोबत असणे ट्विंकलला चांगलेच खटकले. अक्षला प्रियंकासोबत बघताच ट्विंकलचा चांगलाच पारा चढला आणि तिने थेट अक्षय कुमारला घटस्फोट देण्याचे निर्णय घेतला होता.

अखेर खूप विनवण्या केल्यानंतर अक्षय ट्विंकलचे नाते टिकले आणि त्यावेळी प्रियंकासोबत एकही सिनेमात काम करणार नाही असा शब्दच अक्कीने पत्नीला दिला. तेव्हापासून आजपर्यंत अक्षय प्रियंकापासून लांबच राहतो. प्रत्येक कामात एव्हरेडी असणारा सळसळता उत्साह, जोष, जल्लोष आणि मेहनत हेच खिलाडी अक्षयच्या यशाचे खरं कारण आहे.

त्यामुळेच आता भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महागडा अभिनेत्याच्या यादीत अक्षय कुमारचे नाव सामील झाले आहे. कारण अक्षयने आपलं मानधन दुप्पट केले असून प्रत्येक चित्रपटासाठी तो तब्बल ५४ कोटी मानधन घेतो.

आत्तापर्यंत तो प्रत्येक चित्रपटासाठी २७ कोटी मानधन घेत असे.. मात्र वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याने त्याचं मानधन दुपटीने वाढवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र इतकं मानधन घेऊनही तो त्याचं जीवन सरळ साध्या मार्गाने जगतो. त्याच्या वागण्या, बोलण्यात कुठलाही बडेजावपणा जाणवत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.