हार्दिक पंड्याने नताशाच्या आधी या 6 सुंदरींना केले आहे डेट, या मोठ्या अभिनेत्रीचे नाव देखील समाविष्ट आहे…

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू म्हटला जाणारा हार्दिक पंड्याने काही दिवसापूर्वीच त्याचा 28 वा वाढदिवस साजरा केला. हार्दिक जितका त्याच्या खेळाबद्दल चर्चेत आहे, तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. हार्दिकने 1 जानेवारी 2020 रोजी सर्बियन वंशाची अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविचशी समुद्रामद्ये फिल्मी शैलीत सगाई केेली होती.

ज्याचे फोटो देखील सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाले होते. यानंतर दोन्ही स्टार्सनी लग्न केले आणि आता त्यांना एक मुलगा देखील आहे. ज्याचे नाव त्या दोघांनी अगस्त्य असे ठेवले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, नताशाच्या आधी हार्दिकचे नाव बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे.

परिणीती चोप्रापासून उर्वशी रौतेलापर्यंत 6 प्रसिद्ध अभिनेत्री किंवा मॉडेलसोबत हार्दिकच्या अफेअरच्या बातम्या आल्या होत्या. प्रथम त्याचे नाव कोलकाताची प्रसिद्ध मॉडेल लीशा शर्माशी जोडले गेले होते. दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही झाले होते. मात्र, या दोघांनीही त्यांचे नाते कधीही सार्वजनिक केले नाही.

यानंतर त्याचे नाव ईशा गुप्ताशीही जोडले गेले. दोघांचेही लवकरच लग्न होणार असल्याच्या बातम्याही आल्या होत्या, पण तसे होऊ शकले नाही. यानंतर हार्दिकचे नाव बिग बॉस स्पर्धक अली अव्रामशी जोडले जाऊ लागले. दोघांनी अनेक जाहिरातींमध्ये एकत्र काम केले आणि तिथून दोघांमध्ये जवळीक वाढली होती.

या तीन अभिनेत्रींशी नाव जोडल्यानंतर हार्दिकचे नाव बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रासोबत जोडले गेले. दोघेही अनेक ठिकाणी एकत्र दिसले होते, तसेच सोशल मीडियावरही ते एकमेकांच्या पोस्टवर टिप्पणी करताना दिसले होते. मात्र, दोघांनीही नेहमीच त्यांच्या अफेअरच्या बातम्यांना नकार दर्शवला.

त्याचवेळी प्रसिद्ध अभिनेत्री आणि रूषभ पंतची कथित माजी गर्लफ्रेंड असल्याचं म्हटल्या जाणाऱ्या उर्वशी रौतेलासोबत देखिल हार्दिकच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्या होत्या. 2018 मध्ये, दोघेही अनेक वेळा पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले. परंतु दोघांनीही अफेअरच्या बातम्यांना केवळ अफवा असल्याचे म्हटले.

याशिवाय त्याचे नाव अभिनेत्री आणि मॉडेल शिबानी दांडेकरशीही जोडले गेले. पण दोन्ही स्टार्सनी हे वृत्त नाकारले आणि त्यांना अफवा असल्याचे सांगितले. त्याचबरोबर शिबानी सध्या अभिनेता फरहान अख्तरला डेट करत आहे. या सर्वांशी अफेअर केल्यानंतर हार्दिकने नताशा स्टॅन्कोविचशी लग्न केले आणि आज ते एकमेकांसोबत खूप आनंदी आहेत.

दोघांनाही एक सुंदर मुलगा आहे. ज्याच्यासोबत दोघेही अनेकदा फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात. तसेच दोघांनी गेल्या वर्षीच सगाई केेली होती. लग्नापूर्वी दोघांना एक मुलगा होता. अलीकडेच हार्दिकने 30 कोटी किमतीचे एक आलिशान घर देखिल खरेदी केले आहे. ज्याबद्दल तो खूप चर्चेत होता.

Leave a Reply

Your email address will not be published.