बऱ्याच दिवसांपासून अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना कैफच्या अफेअरच्या बातम्या बॉलिवूडमध्ये चर्चेत होत्या. या दोघांनीही गुप्तपणे लग्न केल्याच्या बातम्या देखिल आल्याा होत्या. सोशल मीडियावर दोघांचे एकत्र फोटोही व्हायरल झाले होते. पण या सगळ्या दरम्यान, आता विकी कौशलने अखेर कॅटरिना कैफसोबतच्या सगाईच्या बातमीवरिल मौन तोडले आहे. माध्यमांशी बोलताना त्याने अनेक खुलासे केले आहेत.
विकी कौशल आजकाल शूजित सरकारचा दिग्दर्शित चित्रपट’सरदार उधम’ या साठी चर्चेत आहे. या चित्रपटात तो क्रांतिकारी सरदार उधम सिंह यांची भूमिका साकारत आहे. त्याच्या भूमिकेबद्दल लोक त्याची जोरदार स्तुती करत आहेत. तसेच आपल्या अफेअरच्या बातम्यांबाबत मीडियाशी बोलताना विकी म्हणाला की, ‘ही बातमी तुझ्या मित्रांनी पसरवली होती. योग्य वेळ आल्यावर मी लवकरच सागाई करेन. त्याची वेळही येईल.
विकी आणि कॅटरिना एकमेकांना दोन वर्षांहून अधिक काळापासून डेट करत आहेत. हे जोडपे अनेकदा लंच आणि डिनर करताना एकत्र दिसते. 2020 मध्ये विकी आणि कॅटरिनाने एकत्र दिवाळी साजरी केली होती व कॅटरिनाला विकीच्या घराबाहेर क्लिक केले होते. पण आत्तापर्यंत विकी किंवा कॅटरिना या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल मौन तोडलेले नाहीये.
काही महिन्यांपूर्वी विकीचा भाऊ सनी कौशलने त्याच्या मोठ्या भावाच्या एंगेजमेंटबद्दल बोलले होते. त्याने एका वेब पोर्टलला सांगितले होते की, ‘मला आठवते की विकी सकाळी जिमला गेला होता, तेव्हाच अफवा येऊ लागल्या होत्या. म्हणून, जेव्हा तो घरी परतला, तेव्हा आई आणि वडील यांनी विनोदला मस्करित विचारले की, ‘अरे यार, तुझी एंगेजमेंट झाली आहे, मिठाई खाऊ घाल, आणि मग विकी म्हणाला की, ‘जेवढी खरी सगाई झाली आहे, तेवढी खरी मिठाई खा.’