माधुरी दीक्षितच्या बहिणींना कधी पाहिलंय का? दिसायला आहेत त्यांच्या इतक्याच सुंदर

धकधक गर्ल माधुरीने अभिनयानेच नाहीतर सौंदर्यानेही रसिकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. लग्नानंतर तिच्या खासगी आयुष्यात रमलेली माधुरीने पुन्हा एकदा दमदार कमबॅक करत रसिकांची पसंती मिळवली.

आपले स्मित हास्य, लटके झटके आणि दिलखेचक अदांनी तरुणांची मने घायाळ करणारी धकधक गर्ल आणि हिंदी चित्रपटसृष्टीची खरीखुरी डान्सिंग क्वीन मायदेशी परतली आणि रसिकांचे मनोरंजन करताना पाहून चाहत्यांचाही आनंद व्दिगुणित झाला होता. आजही माधुरीची जादू कायम आहे. मुळात आजपर्यंत तिच्या फिल्मी करिअरविषयीच जास्त सगळ्यांना माहिती आहे. पण खासगी आयुष्याविषयी फारशी कोणाला माहिती नाही.

माधुरी दिक्षितला दोन बहिण आणि एक भाऊ आहे. रूपा दीक्षित आणि भारती दीक्षित असे तिच्या बहिणींची नावं. अजित दीक्षित असे माधुरीच्या भावाचे नाव आहे. माधुरीच्या वडिलांचे नाव शंकर दीक्षित आणि आईचे नाव स्नेहलता दीक्षित आहे. मुळात माधुरीला अभिनेत्री बनवण्यासाठी तिच्या कुटुंबाचादेखील मोठा वाटा आहे.

माधुरीने रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवले असेल पण पडद्यामागे माधुरीच्या बहिणीच तिला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतात. माधुरीच्या बहिणीही कथ्थक नृत्यांगणा आहे.बहिणींमध्ये माधुरी एकटीच अभिनय क्षेत्रात आली. माधुरीच्या बहिणी रुपा आणि भारतीही त्यांच्या आयुष्यात सेटल आहेत. या दोघींनाही कधीच लाईमलाईटमध्ये यायला आवडत नाही. त्यामुळे जरी माधुरीच्या बहिणी असल्या तरी त्या प्रसिद्धीपासून दूरच असतात.

माधुरीसह दोन बहिणींचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. माधुरीला बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागला नाही. माधुरीने तिच्या एका मुलाखतीत याचा उल्लेख केला होता. माधुरी म्हणाली होती, ‘मी कधी अभिनेत्री बनेन असा विचार केला नव्हता. मला कधीही संघर्ष करावा लागला नाही. आपण असे म्हणू शकता की चित्रपट स्वतः माझ्याकडे आले.

Leave a Reply

Your email address will not be published.