शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची जोडी फिल्म इंडस्ट्रीची परिपूर्ण जोडी आहे. दोघांमधील बाँडिंग देखील खूप चांगले आहे. शाहिद आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांच्या वयात सुमारे 14 वर्षांचा फरक आहे. पण याचा त्यांच्या नात्यावर कधीही परिणाम झाला नाही. हे जोडपे अनेकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधतात. शाहिद नेहमी मीरा राजपूतचे कौतुक करताना दिसतो.
शाहिदप्रमाणे मीरा राजपूतही इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह असते. ती अनेकदा इन्स्टाग्रामवर स्वतःचे आणि शाहिदचे फोटो चाहत्यांसाठी शेअर करते. इन्स्टाग्रामवर तीचे 2.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. शाहिदने अलीकडेच एक महागडे घर खरेदी केले आहे, जे अद्याप पूर्णपणे तयार झालेले नाहीये. मीरा राजपूतने या घराच्या बांधकाम साइटवरून स्वतःचे आणि शाहिदचे छायाचित्र शेअर केले आहे.
त्यांच्या नवीन घराच्या बांधकामाचे काम जोरात चालू आहे. चित्रात दोघेही घराच्या जिन्यावर उभे असल्याचे दिसत आहे. हा जिना तो आहे, जो त्यांच्या डुप्लेक्स अपार्टमेंटच्या दोन मजल्यांना जोडत आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हे चित्र शेअर करताना मीरा राजपूतने लिहिले आहे की, ‘वन स्टेप एट अ टाईम’ म्हणजेच एका वेळी एक पाऊल… चित्रात मीरा राजपूत हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तर शाहिद कपूर ग्रे-ग्रीन कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे.
मिरा आणि शाहिद ज्या घरावर उभे आहेत, त्यांनी ते घर 2018 मध्ये खरेदी केले होते. ज्या इमारतीत हे घर आहे, तिथून समुद्राचा एक उत्तम व्हिव दिसतो. मीडिया रिपोर्टनुसार, शाहिदने या इमारतीच्या 42 व्या आणि 43 व्या मजल्याची प्रॉपर्टी खरेदी केली आहे, ज्याची किंमत 56 कोटी रुपये आहे. हे घर सुमारे 4000 चौरस फूट आहे.
तसेेच शहीद त्याचा पुढील चित्रपट ‘जर्सी’ मध्ये दिसणार आहे जो तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. मीरा राजपूतने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने मास्क घातला आहे, तर शाहिदचे मास्क हातात आहे. मीरा राजपूतने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, शाहिद माझ्यापेक्षा 14 वर्षांनी मोठा आहे, पण त्यामुळे आमच्या नात्यावर कधीच फरक पडला नाही. मी त्याच्या अनुभवाचा फायदा घेेते आणि तो माझ्या नवीन दृष्टिकोनाचा लाभ घेऊ शकतो.