वयात येण्या अगोदरच तारुण्याचा आनंद घेऊन मोकळे झाले आहेत हे बॉलीवूड कलाकार!!

लग्न असो, एंगेजमेंट असो, घटस्फोट असो किंवा लव्ह लाईफ असो, चित्रपट स्टार्स त्यांच्या चित्रपट तसेच कामगिरी या गोष्टींमुळे खूप प्रसिद्धी मिळवतात. असे अनेक चित्रपट कलाकार आहेत ज्यांचे हृदय लहानपणापासूनच कोणासाठी धडधडू लागले आणि ते प्रेमात पडले होते…

करीना कपूर खान…
करीना कपूर खान हिंदी सिनेमाची एक अतिशय सुंदर आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. करीना तिच्या वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी तिच्या शाळेतील एका मुलाच्या प्रेमात पडली होती, पण नंतर तिच्या आईला कळल्यावर तिनेे आईचा खुप मार खावा लागला होता. म्हणून त्यांचे ब्रेकअपही झाले. नंतर करीनाचे शाहिद कपूरसोबत दीर्घ अफेअर होते. अभिनेता सैफ अली खानसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर तिने 2012 मध्ये त्याच्याशी लग्न केले.

रणबीर कपूर…
सुप्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर सध्या अभिनेत्री आलिया भट्टला डेट करत आहे आणि लवकरच हे दोन्ही कलाकार विवाहबंधनात अडकतील अशी अपेक्षा आहे. याआधी रणबीरचे अफेअर कटरिना कैफ आणि दीपिका पदुकोणसारख्या मोठ्या अभिनेत्रींसोबतही राहिले आहे. शालेय काळात रणबीर एका मुलीवर प्रेम करायचा. रणबीरने आपल्या एका मुलाखतीत हे सांगून सर्वांना आश्चर्यचकित केले होते की त्याने अवघ्या 15 व्या वर्षीच वर्जिनिटी गमावली होती.

आलिया भट्ट…
आलिया भट्ट सुद्धा अनेक मुलांच्या प्रेमात पडली होती. आलिया भट्टने चित्रपटात येण्यापूर्वी शालेय काळात अली दादरकरला डेट केल्याचे सांगितले जाते. आलिया भट्टचे काही वर्षांपासून रणबीर कपूरसोबत अफेअर सुरू आहे आणि दोघांचे प्रेम जग जाहीर आहे.

रणवीर सिंह …
रणवीर सिंग आजच्या काळातील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेता आहे. 2018 मध्ये रणवीर सिंगने प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणशी लग्न केले पण तो लहानपणापासूनच खूप हुशार होता. त्याने फक्त 12 वर्षांच्या तरुण वयात आपलीी वर्जिनिटी गमावली असे सांगून सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

वरुण धवन…
गेल्या 9 वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत असलेला प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवनचा धाकटा मुलगा वरुण धवनचे नावही या यादीत समाविष्ट आहे. या वर्षी जानेवारीमध्ये त्याने त्याची दीर्घकाळची मैत्रीण नताशा दलालशी लग्न केले. वरुण धवन व नताशाचे अफेअर शाळेच्या काळापासून सुरू होते.

जॅकी श्रॉफ…
या यादीत ज्येष्ठ अभिनेता जॅकी श्रॉफचे नाव पाहून तुम्हाला धक्काच बसला असेल. जेव्हा जॅकी श्रॉफ फक्त 16 वर्षांंचा होता, तेव्हा त्याचे हृदय 13 वर्षांच्या आयशासाठी धडधडत होते आणि नंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात कैद झाले. दोघांनी 1987 मध्ये लग्न केले.

ईशा देओल…
धर्मेंद्र आणि हेमा मालिनीची लाडकी ईशा देओलने 2012 मध्ये भरतशी लग्न केले होते. असे म्हटले जाते की दोघेही शाळेच्या काळापासून एकमेकांच्या प्रेमात होते.

Leave a Reply

Your email address will not be published.