कपाळावर सुरकुत्या, सुजलेला चेहरा,मेकअप शिवाय 7 महिन्याच्या जंहांगीरला घेऊन म्हाताऱ्या बाई सारखी….

करीना कपूर अनेकदा हेडलाईन्सचा भाग बनते. जेव्हाही ती घराबाहेर पडते तेव्हा तिचा लुक आणि स्टाईल सोशल मीडियावर व्हायरल होतो. पण अलीकडेच जेव्हा करीना दिसली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर सूज आलेली दिसली. त्याचवेळी तिच्या कपाळावर सुरकुत्याही पडल्या होत्या, ज्यामुळे ती काही तणावात आहे, असे वाटत होते.

वास्तविक, करीना अलीकडेच तिची मेहुणी अर्थात सैफ अली खानची बहीण सोहा अली खानच्या घरी गेली होती. इथे जाण्याचे कारण सोहा आणि तिचा पती कुमल खेमू यांची मुलगी इनायाचा वाढदिवस होता. इनाया 29 सप्टेंबर रोजी 4 वर्षांची झाली आहे. अशा स्थितीत सोहा आणि कुणाल (कुणाल खेमू) यांनी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने एक भव्य पार्टी आयोजित केली होती.

करीना, सैफ आणि त्यांची दोन मुले तैमूर अली खान आणि जेह अली खान यांनाही या पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. इनायाच्या वाढदिवसाच्या पार्टीत करीना तैमूर आणि जेहसोबत पोहोचली होती. या दरम्यान, तैमूर करीनाच्या समोर चालत होता, तर जेह त्याच्या आईच्या कडावर बसला होता. पार्टीसाठी करीनाने गुलाबी, काळा आणि राखाडी रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस परिधान केला होता.

ती यात छान दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावरील सूज आणि तिच्या मनातील तनावाणे तिचा लुक थोडासा बिघडवला होता. वास्तविक, करीनाच्या चेहऱ्यावर थकवा येण्याचे कारण म्हणजे तिचा गेल्या काही दिवसांपासून सततचा प्रवास. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी तिच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या आगामी चित्रपटाचे मुंबईचे शेडुल पूर्ण केले आहे.

करीनाच्या गरोदरपणामुळे चित्रपटाचे काही शूटिंग बाकी होते, जे करीनाने आता पूर्ण केले आहे, आणि यामुळेच करीनाच्या चेहऱ्यावर थकवा आणि सूज दिसून आली. तसेच, तिचा 7 महिन्यांचा मुलगा जेहने करीनापेक्षा जास्त प्रसिद्धी मिळवली आहे. जेहचा जन्म झाला तेव्हा त्याच्या नावाबद्दल बरीच चर्चा झाली. जेह आणि तैमूरने त्यांच्या चुलत बहिण इनायाच्या वाढदिवसाच्या पार्टीत खूप छान वेळ घालवला.

सोहा अली खानने आपल्या मुलीच्या वाढदिवसाला युनिकॉर्न लँड थीम पार्टी आयोजित केली होती. संपूर्ण घर गुलाबी, निळा, पिवळा आणि हिरव्या रंगाच्या फुग्यांनी सजवण्यात आले होते. त्याचवेळी इनाया हिने गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला होता. यात ती खूपच गोंडस दिसत होती. भाची इनायाच्या वाढदिवसानिमित्त करीनानेही खूप खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या…

Leave a Reply

Your email address will not be published.