उद्योगपती मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या 35 व्या वार्षिक यादीनुसार, ते जगातील 10 वेे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याचबरोबर ते आशियात पहिल्या क्रमांकावर आहेत. विशेषतः अनेक लोक मुकेश अंबानींची पत्नी नीता अंबानीचे चाहते आहेत. नीता अंबानीचे सौंदर्य आणि जीवनशैली हा अनेकदा इंटरनेटवर चर्चेचा विषय असतो.
नीता अंबानीचे कुटुंब सहसा प्रसारमाध्यमांच्या प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करते. मात्र, अंबानी कुटुंबात जेव्हाही एखादा कार्यक्रम होतो, तेव्हा नीताची बहीण तिथे नक्कीच येते. नीता अंबानीच्या बहिणीचे नाव ममता दलाल आहे. ती रवींद्रभाई दलाल आणि पौर्णिमा दलाल यांची मुलगी आहे. ममता तिची बहीण नीतापेक्षा चार वर्षांनी लहान आहे.
एकीकडे नीता नेहमी सोन्याने बहरलेली असते, आणि अतिशय विलासी जीवन जगते, तर दुसरीकडे तिची बहीण ममता खूप सामान्य जीवन जगते. प्रसिद्धीपासून दूर असल्यामुळे नीताची बहीण ममताबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. नीता अंबानी आज एक प्रसिद्ध बिझनेस टायकून बनली आहे, तर तीची बहीण ममता शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. ती शिक्षिका म्हणून काम करते.
तुम्ही सर्वांनी मुकेश अंबानींच्या धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल बद्दल ऐकले असेल. ही भारतातील सर्वात महागड्या शाळांपैकी एक आहे. नीता अंबानी या शाळेची संस्थापिका आहे. तीची लहान बहीण ममता या शाळेत प्राथमिक शिक्षिका आहे. यासोबतच ती शाळेचे व्यवस्थापनही सांभाळते.
ममतांप्रमाणेच, तिची मोठी बहीण नीता अंबानी देखील पूर्वी शिक्षिका असायची. लग्नानंतर काही काळ ती मुलांना शिकवत असे. पण नंतर ती पती मुकेश अंबानींच्या कंपनीत व्यस्त झाली. बॉलिवूड इंडस्ट्रीतील 90% मुले हे धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतात. अशा परिस्थितीत ममतानेे शाहरुख खानची मुलगी सुहाना खानपासून सचिन तेंडुलकरची मुले सारा आणि अर्जुन तेंडुलकर यांना शिकवले आहे. एका मुलाखतीत तिने हा खुलासा केला होता.
ममताला माध्यमांची चमक धमक फारशी आवडत नाही. तिला साधे जीवन जगायला आवडते. तिची जीवनशैली पाहून ती जगातील सर्वात श्रीमंत महिलेची बहीण आहे असे म्हणणे कठीण आहे. ममता आणि नीता यांचे एकमेकांशी खूप जवळचे नाते आहे. प्रत्येक सुख -दु: खात या दोघी एकमेकांच्या पाठीशी उभ्या असतात.
ममता अंबानी कुटुंबातील प्रत्येक कार्यक्रमात हजर असते. ममता तिची भाची ईशा अंबानीच्या लग्नात नीता अंबानीसोबत डान्स करताना दिसली होती. ममता दलालने बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासाठी मॉडेलिंग देखील केले आहे.