तब्बल 242 कोटी रुपयांच्या विमानात फिरते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची बायको,कोणत्याही 5 स्टार हॉटेल….

रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या संपत्तीबद्दल संपूर्ण जग चांगलेच परिचित आहे. अंबानी कुटुंबाची संपूर्ण जगात एक खास ओळख आहे. मुकेश अंबानी फिरतात व्यवसाय जगतातील एक मोठे नाव आहे, तसेच ते बऱ्याचदा चर्चेत राहतात, पण त्यांचे कुटुंबही अनेकदा प्रसिद्धीचा एक भाग राहते. विशेषत: मुकेश अंबानींची पत्नी नीता अंबानीला लाईम लाईटमध्ये राहण्याची खूप आवड आहे.

नीता अंबानीची लोकप्रियता कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीये. त्याच वेळी, तिचे सौंदर्य देखील लोकांना खूप आकर्षित करते. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांचे छंद देखील खूप मोठे आहेत. ती लाखो रुपयांचा चहा पिते, लाखो रुपयांचे कपडे घालते. त्याचबरोबर ती कोट्यवधी रुपयांचा फोन वापरते.

तसेच ती कोट्यवधी रुपयांच्या आलिशान शाही चार्टर्ड विमानात प्रवास करते. ज्या विमानात नीता अंबानी प्रवास करते, ते विमान पती मुकेश अंबानी यांनी 2007 मध्ये तीच्या 44 व्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून तिला दिले होते. प्राप्त झालेल्या मीडिया रिपोर्टनुसार, नीता अंबानीच्या या एअरबेस 319 कॉर्पोरेट विमानाची किंमत 242 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

नीता अंबानीजवळील आलिशान रॉयल चार्टर्ड विमानात प्रत्येक सोय आहे. त्यामधील सौंदर्य पाहून, त्याला उडणारे महल असेही म्हटले तर आश्चर्य वाटणार नाही. या विमानात फाईव स्टार हॉटेल सारख्या सुविधा आहेत. या विमानात, पार्टी एरिया, लाइव्ह बार, आणि जकूजी पासून शॉवर पर्यंत सर्व काही दिसेल. यावरून नीता अंबानीचे कोणत्या प्रकारचे छंद आहेत याचा तुम्ही अंदाज लावू शकता.

विमानात आरामात बसून बिझनेस डील किंवा व्यवसायाचे नियोजन देखील करता येते. यासाठी विमानात एक बैठक कक्ष बनवण्यात आला आहे. बैठकीच्या खोलीतच खाण्यापिण्याची शाही व्यवस्था करण्यात आली आहे. येथे नीता पाहुण्यांसोबत लंच किंवा डिनर करते. या एअरबेस 319 कॉर्पोरेट विमानात एक नव्हे तर अनेक जेवणाचे क्षेत्र तयार करण्यात आले आहेत.

या विमानाची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे विमान बुलेट प्रूफ आहे. हे अत्यंत सुरक्षित आहे. नीता अंबानी आपल्या विमानात प्रवास करते तर, मुकेश अंबानी यांचे देखिल स्वतःचे विमान आहे. विमानात उपस्थित असलेल्या इतर सुविधांबद्दल बोलायचे झाले तर यात एक संगीत प्रणाली, गेम कन्सोल, उपग्रह टीव्ही आणि अत्याधुनिक वायरलेस कम्युनिकेशन सिस्टम देखील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.