बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा एक ताजा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये कंगना राणावत मास्क न घालता विमानतळावर ‘NO MASK, NO ENTRY’ झोनमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते की, कंगना राणावतच्या आजूबाजूला उभे असलेले प्रत्येक व्यक्ती आणि सुरक्षा कर्मचारी यांनी मास्क घातलेले दिसत आहे.
मात्र, कंगना राणौत मास्क न घालता तिच्या कारमधून खाली उतरते आणि नंतर हळू हळू विमानतळाच्या दिशेने जाऊ लागते. दरम्यान, काही फोटोग्राफर कंगना राणावतला थांबवतात, ज्यावर अभिनेत्री एका ठिकाणी थांबते आणि फोटोशूट करून घेते, पण नंतर मास्क घालण्याच्या सूचना देणाऱ्या बोर्डाकडे दुर्लक्ष करून पुढे जाते.
लोकांनी कंगनाला जोरदार ट्रोल केले आहे. हा व्हिडीओ पापाराझी व्हायरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच एका वापरकर्त्याने टिप्पणी विभागात लिहिले आहे की, ‘व्वा, नो मास्क नो एंट्रीकडे दुर्लक्ष केले गेले, जसे पक्ष मते मिळाल्यानंतर जनतेला करतात.’
त्याचप्रमाणे, एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, ‘ती कधीही मास्क का घालत नाही?’ एका वापरकर्त्याने टिप्पणी केली आहे की, ‘व्वा तिने मास्कही घातलेे नाहीये आणि सिक्युरिटीने तिला चेेकही केेले नाही.’ एका वापरकर्त्याने टिप्पणी केली आहे – ती सुवर्णपदक जिंकून आली आहे का? अशा, अनेक वापरकर्त्यांनी कंगनाला मास्क न घातल्याबद्दल ट्रोल केले आहे.