साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनकडे लक्झरी कारचे चांगलेच कलेक्शन आहे.अर्जुनच्या कारच्या या लिस्ट कलेक्शनमध्ये सर्वात आलिशान कारचे नावही समाविष्ट आहे.अल्लू अर्जुनला एक नवीन व्हॅनिटी व्हॅन मिळाली आहे.अर्जुनने व्हॅनिटी व्हॅनचे हे चित्र त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
अर्जुनची ही व्हॅनिटी कार सामान्य व्हॅनसारखी नाहीये.अर्जुनची ही व्हॅनिटी कार आतून एका फाइव स्टार हॉटेलसारखी आहे. अहवालानुसार, अर्जुनच्या व्हॅनची किंमत 7 कोटी रुपये आहे.अर्जुनची व्हॅनिटी कार रेड्डी कस्टम्सने विशेष कस्टमाइज केले आहे. व्हॅनच्या आत, लक्झरी केविनसह, अलू अर्जुनचे नाव एए देखील चिकटवले आहे.
मास्टर केविनकडे एक रेक्लाइनर देखील आहे.जे अर्जुनच्या बैठकांसाठी तसेच टीव्ही पाहण्यासाठीही वापरले जाते.या व्यतिरिक्त, व्हॅनमध्ये आराम करण्याची लक्झरी सुविधा देखील आहे. रेड्डी कस्टम्सला ही व्हॅन तयार करण्यासाठी सुमारे 5 महिने लागले असल्याची माहिती मिळाली आहे. व्हॅनच्या इंटीरियरवर 3.5 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
अर्जुनने वयाच्या दुसऱ्या वर्षीचं चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती. त्याचा पहिला चित्रपट 1985 मधील ‘विजेता’ हा होता. 2003 मध्ये तो ‘गंगोत्री’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत बालकलाकार होता. अर्जुनने आत्तापर्यंत आर्या (2004), आर्य -2 (2009), येवाडू (2014), आणि ना पेरू सूर्य, ना इलू इंडिया (2018) अशा 20 चित्रपटांमद्ये अभिनय केला आहे.