मलायका अरोरा खानला कोणत्याही ओळखीची गरज नाहीये. दररोज ती तिच्या बोल्ड कमेंट्स आणि लूकमुळे चर्चेत राहते. याशिवाय आणखी एक गोष्ट आहे ज्यामुळे ती चर्चेत राहिली, ती म्हणजे तिचे रेलेशनशीप, सध्या मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. सध्या सुपरमॉडेल ऑफ द इयरची जजिंग करणारी मलायका केवळ अभिनेत्री आणि डान्सरच नाही तर सुपरमॉडेल देखील आहे.
नुकत्याच झालेल्या संभाषणादरम्यान, तिने तिच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक मुद्द्यावर मोकळेपणाने बोलले आहे, तसेच तिने तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबतच्या नात्याशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या. सुप्रसिद्ध मॉडेल मिलिंद सोमण आणि मलायका शो दरम्यान एकमेकांशी बोलत होते, या दरम्यान मिलिंदने तीला एका अशा व्यक्तीचे नाव सांगण्यास सांगितले जो तीला खोलवर ओळखतो, मग मलायका ने लगेच अर्जुन कपूरचे नाव घेतले आणि त्याच्या मागचे कारण देखील सांगितले.
मलायका म्हणाली, “मला म्हणायलाच हवे की अर्जुन मला ओळखतो, तो मला समजतो, तो मला भेटतो आणि मला परेशान देखिल करतो.” तसेच मलायकाला कोणत्या प्रकारची मुले आवडतात हे देखील तिने सांगितले आहे. ती म्हणाली की मला रफ मुले आवडतात. मला चांगली कि’स करणारे मुलेही फार आवडतात, मला गुळगुळीत चेहरे असणारे मुले मुळीच आवडत नाहीत. तसेच मला गोसीफ करणारे मुले तर आवडत नाहीत.
अर्जुन आणि मलायका मध्ये सुमारे 12 वर्षांचा फरक आहे, परंतु दोघेही याची पर्वा करत नाहीत आणि एकत्र आनंदी आहेत. अलीकडेच ते दोघे एका रेस्टॉरंटच्या बाहेर दिसले होते, जेव्हा ते रोमँटिक डिनर करून घरी परतत होते. मलाइका ने सर्वप्रथम कॉफी विथ करण या शोमध्ये तिच्या नात्याबद्दल कबूल केले होते.
दोघेही अनेकदा एकमेकांसोबत फोटो शेअर करतात, काही दिवसांपूर्वी त्यांनी रोमँटिक डेटचा एक फोटो शेअर केला होता, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. मलायका ने अरबाज खानला 5 वर्षे डेट केल्यानंतर 1998 मध्ये लग्न केले होते. सुमारे 17 वर्षे एकत्र राहिल्यानंतर 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला आणि दोघांनाही अरहान नावाचा मुलगा आहे, तो सध्या मलायकासोबत राहतो.