दीपिकालाचा रणबीर बद्दल धक्कादायक खुलासा, म्हणली-मी त्याला रंगेहाथ पकडले होते, पण माझ्यासाठी से:क्स…

दीपिका पदुकोणकडे आज बॉलिवूडमधील सर्वात मोठी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 2007 साली अभिनेता शाहरुख खानसोबत ओम शांती ओम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दीपिकाने चित्रपसृष्टीत चांगलेच नाव कमावले आहे. तसेच तिने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

दीपिका पदुकोण आपला 35 वा वाढदिवस साजरा करणार आहे. तीचा जन्म 5 जानेवारी 1986 रोजी डेन्मार्कमध्ये झाला होता. दीपिका पदुकोण हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात चर्चित आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका पदुकोण तिच्या चित्रपटांसाठी आणि तिच्या सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी तसेच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी प्रसिद्धीमधे असते.

सर्वांना माहिती आहे की दीपिका पदुकोणने 2018 मध्ये अभिनेता रणवीर सिंगशी लग्न केले. दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे आणि दोघांचेही लग्नापूर्वी अफेअर होते. पण दीपिकाचे नाव रणवीरबरोबरच इतर अनेक कलाकारांशी जोडलेले आहे. तिचे सर्वात प्रसिद्ध अफेअर अभिनेता रणबीर कपूरसोबत राहिले आहे.

रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दीपिका पदुकोणला मोठा धक्का बसला आणि तीही डिप्रेशनची शिकार झाली होती. एकदा दीपिकाने एका मुलाखतीत रणबीर कपूरचे नाव न घेता ब्रेकअपबद्दल सांगितले होते. दीपिकाने रणबीरला ब्रेकअपसाठी जबाबदार म्हटले होते. दीपिकाने असेही म्हटले होते की, तिने रणबीरला दुसऱ्या कुणासोबत रंगेहाथ पकडले होते, तरीही तिने त्याला माफ केले होते.

नंतर दीपिकाने स्वतः रणबीर कपूरपासून वेगळे होणे योग्य मानले. रणबीरपासून वेगळे झाल्यानंतर दीपिका आणि रणवीर सिंग यांच्यातील जवळीक वाढली. एकदा एका मुलाखतीत दीपिका पदुकोणने सांगितले होते की त्याने आधी फसवणूक केली आणि नंतर त्याने माझी माफी माागितली.

अभिनेत्री म्हणाली होती की, ‘माझ्यासाठी से’ क्स म्हणजे फक्त शारीरिक असणे नाही, तर त्यात भावना देखील जोडल्या जातात. जेव्हा मी रिलेशनशिपमध्ये होते, मी कधीच त्याची फसवणूक केली नाही. जर मी त्याला फसवले तर मी नात्यात का राहू? पण सगळेच असे नसतात, त्यामुळे मला आधी खूप त्रास सहन करावा लागला. मी इतकी मूर्ख होते की मी त्याला दुसरी संधी दिली होती, पण मी त्याला रंगेहाथ पकडले.

पुढे अभिनेत्री दीपिका म्हणाली, ‘नंतर त्याने माझी विनवणी केली, म्हणून मी त्याला माफ केले पण हा माझा मूर्खपणा होता. त्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडायला मला बराच वेळ लागला. पण आता मी त्या सर्व गोष्टींमधून बाहेर पडले आहेे. जेव्हा त्याने पहिल्यांदा माझी फसवणूक केली, तेव्हा मला वाटले की या नात्यात किंवा माझ्यामध्ये काही समस्या असेल. पण जेव्हा फसवणूक एखाद्याची सवय असते, तेव्हा तो असेच करतो.

तिच्या ब्रेकअपबद्दल बोलताना दीपिका पुढे म्हणाली, ‘मी माझ्या नात्यात खूप काही दिले, पण मला परत काही मिळालेच नाही. जेव्हा नातेसंबंधात फसवणूक होते, तेव्हा आदर गमावला जातो, विश्वास गमावला जातो, कारण हे तुमच्या नात्याचे आधारस्तंभ आहेत जे तुम्ही तोडू शकत नाहीत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दीपिका आणि रणवीर सिंगचा आगामी चित्रपट ’83’ आहे. यामध्ये रणवीर कपिल देवच्या भूमिकेत दिसणार आहे तर दीपिका कपिलच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.