टैक्स चोरी वर सोनू सूदचे मोठे विधान, म्हणाला-मला दोन राजकीय पक्ष्यांनी राज्यसभेचे सीट ऑफर केले होते, पण मी नकार दिला’

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद या दिवसात टैक्स चोरीच्या आरोपांनी घेरला आहे. आयटी अधिकाऱ्यांनी सोनूवर 20 कोटी रुपयांंचा टैक्स चोरी केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर सोनू सूदने या प्रकरणावर आपले मत मांडले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनू म्हणाला की, मी कधीही काही चुकीचे केलेले नाहीये, मला दोन वेळा राज्यसभा सीटची ऑफरही मिळाली आहे.

एनडीटीव्हीशी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोनू म्हणाला की, मी कोणताही कायदा मोडला नाहीये. तरीही, टैक्स अधिकाऱ्यांनी सलग 4 दिवस माझी चौकशी केली आहे. त्या चौकशीत मला जे काही प्रश्न विचारले, मी त्यांना त्याची अचूक उत्तरे दिली, तसेेच त्यांना हवे ते कागदपत्रही मी दिले आहेत.

त्याने पुढे सांगितले की, मला दोन पक्षांकडून राज्यसभा सीटच्या ऑफरही आल्या आहेत. पण मी त्या नाकारल्या… सोनू सूदने असेही म्हटले आहे की, मी माझे काम केले आहे, व त्यांनी त्यांचेे.. त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले होते, मी त्या प्रत्येक प्रश्नचे उत्तरे पूर्ण कागदपत्रांसह दिली. आणि हे माझे कर्तव्य देखील आहे.

या मागे ‘राजकीय हेतू’ असण्याच्या प्रश्नावर तो म्हणाला की, मी अद्याप कोणत्याही निष्कर्षावर पोहोचलो नाहीये. व मी शिक्षणावर काम करत आहे. मी खुल्या मनाचा आहे. जेव्हाही कोणतेही राज्य मला बोलवेल, तेेेव्हा मी त्यांना नक्कीच मदत करेल. सोनूने म्हनाला की , जे काही घडले, त्यामूळे मी अजिबात अस्वस्थ होणार नाही. किंवा मी थांबणार नाही, काम चालूच राहील. अजून खूप मैल बाकी आहेत. आणि मी लोकांना मदत करण्यासाठी दिवस रात्र काम करत राहीन.

Leave a Reply

Your email address will not be published.