‘बिग ब़ॉस मराठी 3’ मध्ये चमकलेला हा गोल्डन मॅन नक्की आहे तरी कोण, कोण आहे संतोष चौधरी,जाणून घ्या….

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘बिग ब़ॉस मराठी’ चा ३ सिझनचा श्री गणेशा काल झाला. गेल्या दोन वर्षांपासुन या वादग्रस्त शो ची वाट प्रेक्षक आतुरतेने पाहात होते. यात कोणते स्पर्धक सहभागी होणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. मराठी कलाक्षेत्रीतील अनेक कलाकारांची नावं चर्चेत होती.

काल ग्रॅंड प्रिमीअरला अभिनेत्री सोनाली पाटील, अभिनेता विशाल निकम, आभिनेत्री स्नेहा वाघ अशा अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत. या यादीत मराठीचा ‘गोल्डन मॅन’ म्हणुन आपली ओळख निर्माण करणारा दादुस म्हणजे संतोष चौधरी यांची देखिल एंट्री झाली.

संतोष हे मराठीतील लोकगीत गाणारे प्रसिध्द गायक आहेत. त्यांनी अनेक आगरी आणि कोळी गाण्यांना त्यांचा आवाज दिला आहे. त्याचं सोन्या बद्दलचं प्रेम पाहुन चाहत्यांनी त्यांना ‘गोल्डन मॅन’ असे नाव दिलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दादुस आवाजासोबत अजुन कोणती जादु करतील यासाठी त्यांचे चाहते खुप उत्सुक आहेत.

संतोष चौधरी हे त्यांच्या आक्रमक पण मनोरंजक स्वभावासाठी ओळखले जातात. ‘गोल्डन मॅन’ संतोष एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना सतत चर्चेत राहायला आवडते हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.