दिसते तसे नसून असे आहे अमिताभ-ऐश्वर्या चे रेलाशन, सासरा-सून नाही तर…..

असे म्हटले जाते की, ज्या सूनेला तिच्या सासरच्या घरात खूप प्रेम मिळते ती खूप भाग्यवान असते. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय देखील या पैकी एक आहे. ऐश्वर्याला बच्चन कुटुंबात खूप प्रेेेेेम मिळते. विशेषत: सासरा अमिताभ बच्चन आपल्या सुनेवर आपला जीव शिंपडतात. ऐश्वर्या ही बिग बीची लाडली आहे. तो आपल्या सुनेवर इतके प्रेम करतो की तो तिच्याविरुद्ध एक शब्दही ऐकू शकत नाही. जर कोणी तीच्या विरोधात बोलले तर तो योग्य उत्तर देतो.

एकदा चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर ने ऐश्वर्या आणि तिच्या कामावर काही वाईट टिप्पणी केली होती. जेव्हा अमिताभला हे कळले तेव्हा तो लगेचच आपल्या सुनेला वाचवण्यासाठी ढाल म्हणून उभा राहिला होता. ही घटना 2011 मधील आहे. ऐश्वर्या मधुर भांडारकरच्या ‘हिरोईन’ मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम करत होती. मात्र, शूटिंगनंतर काही दिवसांनी तीने चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. ऐश्वर्याचा हा निर्णय ऐकून मधुर भांडारकर स्तब्ध झाला होता.

ऐश्वर्या 65 दिवस या चित्रपटाशी संबंधित होती. इतके दिवस शूटिंग केल्यानंतर तीने हा चित्रपट मध्येच सोडला होता. अचानक शूटिंग सोडण्याचे कारण ति प्रेग्नेंट झाली होती. शूटच्या मध्येच तिला तिच्या प्रेग्नेंसीची माहिती मिळाली. यानंतरच तिने ठरवले होते की ती यापुढे चित्रपटात काम करणार नाही. मात्र, मधुर भांडारकर तीच्या निर्णयावर संतापला होता.

या घटनेनंतर मधुरने ऐश्वर्यावर आरोप केला होता की जर तिला तिच्या गर्भधारणेबद्दल आधीच माहिती होती, तर तिने हे लपवून शूटिंग का सुरू ठेेवली? तीने अचानक चित्रपटात काम करण्यास नकार का दिला, यामुळे आमचे खूप मोठे नुकसान होईल. हा एक मोठा प्रकल्प आहे. मधुर भांडारकर पुढे एका मुलाखतीत म्हणाला की, जर ऐश्वर्याने आम्हाला तिच्या गर्भधारणा आणि आरोग्याच्या समस्येबद्दल सांगितले असते तर आम्ही शूटिंग सुरू केली नसती.

आम्हाला माध्यमांकडून कळले की ऐश्वर्या गर्भवती आहे आणि तिची ड्यू डेट नोव्हेंबरमद्ये आहे. आम्ही सुमारे दीड वर्ष या प्रकल्पावर काम करत होतो. आता त्यावर पाणी फिरले आहे. मधुर भांडारकरने नंतर करीना कपूरला या चित्रपटात कास्ट केले. दुसरीकडे, जेव्हा मधुर भांडारकरने ऐश्वर्यावर हे आरोप केले, तेव्हा सासरा अमिताभ बच्चन मीडियासमोर स्पष्टीकरण देण्यासाठी आला.

तेंव्हा तो ऐश्वर्याचा बचाव करताना म्हणाला की, ‘जेव्हा ऐश्वर्याने चित्रपट साइन केला होता, तेव्हा सर्वांना माहित होते की ती विवाहित आहे. तर तुम्हाला असे म्हणायचे आहे का, की अभिनेत्रींनी लग्न करू नये किंवा मुले होऊ नयेत? करारामध्ये असा कोणताही नियम नाही असे मला वाटते. तसेेच, ही पहिलीच वेळ नाहीये जेव्हा बिग बीने आपल्या सूनेची अशी काळजी घेतली आहे.

याआधीही 2015 मध्ये, एका कार्यक्रमात ऐश्वर्या रायचा ड्रेस रेड कार्पेटवर फोटो काढताना पायात अडकला होता. तेव्हाही अमिताभ बच्चन कोणताही संकोच न करता आला आणि त्याने आपल्या सुनेचा ड्रेस ठीक करण्यात मदत केली होती. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये जया बच्चन ने सांगितले होते की, ऐश्वर्याला पाहून बिग बीचा चेहरा नेेहमी फुलतो.

Leave a Reply

Your email address will not be published.