आयकर विभागाचे पथक सोनू सूदच्या घरी आणि कार्यालयासह अनेक वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचले होते, जो की कोरोना काळात अनेक गरजूंना मदत करून प्रसिद्धीत आला होता. अनेक लोक विभागाच्या या सर्वेक्षणाला छा’पा म्हणूनही सांगत आहेत, लोकांचे म्हणणे आहे की सरकारला सोनू सूदने मदत केली पचत नाहीये.
तसेच, हे सर्वेक्षण त्याच्या घरी 2 दिवस चालले. मात्र, आतापर्यंत आयकर विभागाकडून याबाबत कोणतेही विधान आलेले नाही. रिपोर्ट्सनुसार, सोनू सूदच्या प्रॉपर्टी डीलबाबत ही चौकशी केली जात आहे. त्यामुळे विभागाने त्याच्या कार्यालयातील हॉटेलसह सहा ठिकाणी कागदपत्रांची छाननी केली. आयटी टीमने सतत 20 तास अकाउंट बुक, उत्पन्न खर्च आणि आर्थिक नोंदी तपासल्या.
असे सांगितले जात आहे की अधिकाऱ्यांनी कुटुंबातील सदस्यांसह त्याच्या घरात उपस्थित असलेल्या इतर सदस्यांचीही चौकशी केली. त्याच्याकडे सूद चॅरिटी फाउंडेशन नावाची एक स्वयंसेवी संस्था आहे, जी शिक्षण, आरोग्य सेवा, नोकऱ्या आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर काम करते, त्याचीही येथे चौकशी करण्यात आली.
“अभिनेता आणि त्याच्या सहकाऱ्यांची मालमत्ता असलेल्या परिसरात शोध सुरू असताना, क’रचु:कवेगिरीचे पुरावे सापडले आहेत. अनेक बो’गस घटकांकडून असुरक्षित कर्जाच्या रूपात सोनूने त्याच्या बे:हिशेबी उत्पन्नाचा मार्ग काढला होता. आतापर्यंतच्या तपासात अशा २० नोंदींचा वापर केल्याचं उघड झालंय. तसेच संबंधित सर्वांनीचं बो:गस नोंदी दिल्याची बाब स्वीकारली आहे. त्यांनी रोख रकमेच्या बदल्यात चेक दिल्याचंही मान्य केलंय. तसेच कर चुकवण्याच्या हेतूने खात्यांच्या पुस्तकात कर्ज म्हणून व्यावसायिक पावत्या छा’पल्या गेल्या असून त्याचा वापर गुं’तव’णूक करण्यासाठी आणि मालमत्ता घेण्यासाठी केला गेला आहे. आतापर्यंत एकूण २० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर अशा पद्धतीने चुकवला आहे,” असे आयकर विभागाने सांगितले.
सोनुवरील आरोपांनुसार, करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान गेल्या वर्षी जुलैमध्ये स्थापन केलेल्या त्याच्या ना-नफा सूद चॅरिटी फाउंडेशनने यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत १८ कोटींपेक्षा जास्त देणगी गोळा केली होती. त्यापैकी १.९ कोटी रुपये त्याने लोकांची मदत करण्यासाठी खर्च केले आणि उर्वरित १७ कोटी रुपये त्याच्या बँक खात्यात आहेत.
सोनू सूदच्या घरी गेलेल्या आयकर विभागाच्या सर्वेक्षणाविरोधात अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले आणि लिहिले की, सत्याच्या मार्गावर लाखो अडचणी येतात, पण विजय नेहमीच सत्याचाच होतो. सोनू सूदला, लाखो कुटुंबांचे आशीर्वाद आहेत ज्यांना त्याने कठीण काळात साथ दिली.
तसेच एक व्हिडिओ पोस्ट करताना आप चे नेते आतिशी म्हणाले की, सोनू सूद केवळ एक चित्रपट कलाकार नाही तर एक सामाजिक कार्यकर्ता आहे. तसेच कोरोनाच्या काळात, सोनू सूदने हजारो मजूर आणि बेघर लोकांना त्यांच्या घरी नेऊन सोडण्यासाठी आणि लॉकडाऊनच्या वेळी रेशन मदत पुरवण्यासाठी चर्चेत आला होता, त्यावेळी सोनू सूदला सोशल मीडियावर मसीहा म्हटले जात होते.