आयकर विभागाचे पथक सोनू सूदच्या घरी आणि कार्यालयासह अनेक वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचले होते, जो की कोरोना काळात अनेक गरजूंना मदत करून प्रसिद्धीत आला होता. अनेक लोक विभागाच्या या सर्वेक्षणाला छापा म्हणूनही सांगत आहेत, लोकांचे म्हणणे आहे की सरकारला सोनू सूदने मदत केली पचत नाहीये.
तसेच, हे सर्वेक्षण त्याच्या घरी 2 दिवस चालले. मात्र, आतापर्यंत आयकर विभागाकडून याबाबत कोणतेही विधान आलेले नाही. रिपोर्ट्सनुसार, सोनू सूदच्या प्रॉपर्टी डीलबाबत ही चौकशी केली जात आहे. त्यामुळे विभागाने त्याच्या कार्यालयातील हॉटेलसह सहा ठिकाणी कागदपत्रांची छाननी केली. आयटी टीमने सतत 20 तास अकाउंट बुक, उत्पन्न खर्च आणि आर्थिक नोंदी तपासल्या.
असे सांगितले जात आहे की अधिकाऱ्यांनी कुटुंबातील सदस्यांसह त्याच्या घरात उपस्थित असलेल्या इतर सदस्यांचीही चौकशी केली. त्याच्याकडे सूद चॅरिटी फाउंडेशन नावाची एक स्वयंसेवी संस्था आहे, जी शिक्षण, आरोग्य सेवा, नोकऱ्या आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर काम करते, त्याचीही येथे चौकशी करण्यात आली.
खरं तर, आयकर विभाग सोनू सूदच्या एका प्रॉपर्टी डीलची चौकशी करत आहे, जी त्याने लखनऊमधील एका रिअल इस्टेट कंपनीसोबत केली आहे. असे सांगितले जात आहे की त्याच्या याच कराराची चौकशी सुरू आहे, या करारामध्ये कर चोरीचे आरोप आहेत, ज्यासाठी आयकर अधिकारी त्याची चौकशी करण्यासाठी आले होते.
तसेच आयकर विभागाणे काही कागदपत्रेही जप्त केली आहेत. 27 ऑगस्ट रोजी सोनू सूदला दिल्लीतील एका शिक्षण कार्यक्रमाचे ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले आहे. या दरम्यान त्याने अरविंद केजरीवाल यांच्यासोबत पत्रकार परिषदेत भाग घेतला होता. तेव्हापासूनच, ‘आप’शी त्याच्या घनिष्ठतेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते.
आयकर विभागाने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकामध्ये नमूद केले की, सोनू सुद आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी २० कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचा कर चुकवला आहे. तसेच सोनूच्या चॅरीट संस्थेला २.१ कोटी रुपयांची आर्थिक मदत परदेशातून झाली होती. परंतु ही मदत गैरमार्गाने करण्यात आली होती. या व्यवहारामुळे परदेशी देणगी नियमन कायद्याचे (FCRA) उल्लंघन झाले आहे. तसेच जमा झालेला पैसा हा एका क्राऊड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवरून जमा करण्यात आला होता.
आयकर विभागाने पुढे सांगितले आहे की, सोनूने खोटेपणा करून आणि कर्जाच्या रुपात बेहिशोबी पैसा जमा केला आहे. इतकेच नाही तर सोनूने २०२० मध्ये त्याची स्वतःची सामाजिक संस्था सुरू केली. त्याच्या या संस्थेला १ एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत १८.९४ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. या देणग्यांच्या रक्कमेतील १.९ कोटी रुपये वेगवेगळ्या कामासाठी खर्च झाले आहेत. तर शिल्लक राहिलेले १७ कोटी रुपये अद्याप खात्यामध्ये आहेत.
सोनू सूदच्या घरी गेलेल्या आयकर विभागाच्या सर्वेक्षणाविरोधात अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले आणि लिहिले की, सत्याच्या मार्गावर लाखो अडचणी येतात, पण विजय नेहमीच सत्याचाच होतो. सोनू सूदला, लाखो कुटुंबांचे आशीर्वाद आहेत ज्यांना त्याने कठीण काळात साथ दिली.
तसेच एक व्हिडिओ पोस्ट करताना आप चे नेते आतिशी म्हणाले की, सोनू सूद केवळ एक चित्रपट कलाकार नाही तर एक सामाजिक कार्यकर्ता आहे. तसेच कोरोनाच्या काळात, सोनू सूदने हजारो मजूर आणि बेघर लोकांना त्यांच्या घरी नेऊन सोडण्यासाठी आणि लॉकडाऊनच्या वेळी रेशन मदत पुरवण्यासाठी चर्चेत आला होता, त्यावेळी सोनू सूदला सोशल मीडियावर मसीहा म्हटले जात होते.