जेव्हा माहेरी परतलेल्या श्वेता बच्चनवर भारी पडली ऐश्वर्या,एकूण थक्क व्हाल!!

ऐश्वर्या राय बच्चन कुठेही दिसली की सगळे कॅमेरे तिच्याकडे वळतात. होय, कार्यक्रम असो, विमानतळ असो किंवा रस्ता, ऐश्वर्या राय बच्चनच्या प्रत्येक लूकला तिच्या चाहत्यांकडून प्रशंसा मिळते. एवढेच नाही तर बच्चन कुटुंब सर्व सण धूमधडाक्याने साजरे करण्यासाठी ओळखले जाते आणि या प्रसंगी संपूर्ण कुटुंबच जमते असे नाही तर ऐश्वर्या रायचे एक वेगळे रूप या निमित्ताने पाहायला मिळते.

जेव्हा श्वेता बच्चन तिच्या मुलांसह नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे करण्यासाठी माहेरी आली होती, व या सणाला तिची वहिनी ऐश्वर्या राय स्वतः सुंदर कपडे परिधान करून तयार होती. याशिवाय, टीने आपली लाडकी मुलगी आराध्या बच्चन हिलाही अतिशय गोंडस पारंपरिक लूकमध्ये तयार केले होते.

सर्वप्रथम आपण बच्चन कुटुंबाची मुलगी श्वेताच्या लूकबद्दल बोलूया… या सुंदर लेडीने स्वतःसाठी बेबी पिंक कलर सूट सेट निवडला होता. त्यामधे लांब कुर्ता आणि खाली प्लाझो पँट होती. कुर्त्यावर एकंदर कट वर्क एम्ब्रॉयडरी होती, ज्याच्या सहाय्याने सिक्वन्स केले गेलेले होते. जेे की नेेटने बनवलेल्या तिच्या दुपट्ट्याच्या सीमेवरही लावलेेले होतेे. श्वेताने लुकमध्ये किमान दागिने ऍड केेेेेले होते. तिने सोन्याचे ब्रेसलेट आणि लिव्हेट नेकपीसही घातला होता. श्वेता ने बिंदी, कमीत कमी मेकअप आणि सैल केसांसह राऊंड ऑफ केले होते.

आता आपण बच्चन घराण्याची सून ऐश्वर्या राय बद्दल बोलूया… तर तीही साध्या लूकमध्येही दिसली होती, पण तरीही तिचे सौंदर्य पाहण्यासारखे होते. ऐश्वर्याने या सणाच्या क्षणासाठी सूती सलवार-सूट निवडला होता. ऑफ व्हाईट शेडच्या या सेटमध्ये लांब कुर्ता आणि प्लाझो पायजामा होता. त्याच्या बॉर्डर वर सोनेरी पातळ पट्टी लावण्यात आली होती, जी दुप्पटावरही दिसत होती.

ऐश्वर्याने तिचा मेकअप कमीत कमी ठेवून डोळे आयलाइनर आणि ओठ लाल लिपस्टिकने हायलाइट केले होते. तीने हातात सोन्याच्या बांगड्या आणि ब्रासलेट परीधान केले होते. तसेच तिने नीलम आणि हिऱ्याची बनवलेली अंगठी घातलेली परीधान केली होती. अभिनेत्रीने कानात हलक्या वजनाचे व सोन्याचे कानातले देखील परीधान केले होते.

त्याच वेळी, या अद्भुत प्रसंगी, आराध्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. अभिषेक-ऐश्वर्याच्या लाडकीने ऑफ-वाइड शेडचा लेहेंगा सेट घातला होता. त्यात ए-लाइन स्कर्ट आणि वर स्लीव्हलेस चोळी होती. कलरब्लॉक इफेक्ट तयार करण्यासाठी त्याच्यासोबत एक लाल दुपट्टा मॅच केला होता. आराध्याने प्रिंटेड लेहेंगासह डायमंड इयर रिंग्स घातले होते. या पारंपारिक लुकमध्ये आराध्या बच्चन किती गोंडस दिसत होती हे तुम्हीच चित्रात पाहू शकता.

त्याचबरोबर शेवटी ऐश्वर्याच्या फिल्मी करिअरबद्दल बोलूया… ऐश्वर्या ‘पोन्नीयन सेल्वन’ चित्रपटात दिसणार आहे आणि मणिरत्नम या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. त्याचबरोबर यापूर्वी मणिरत्नम आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.