1969 साली हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणारी ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनीने आपल्या काळात प्रत्येकाच्या हृदयावर राज्य केले आहे. तीला मोठ्या पडद्यावर पाहून चाहते खूप उत्साहित होत असत. हेमा मालिनी बऱ्याच काळापासून चित्रपट जगतापासून दूर आहे, तसेच ती राजकारणाच्या जगात बऱ्याच काळापासून सक्रिय आहे.
हेमा भारतीय जनता पक्षाच्या मथुरेतून लोकसभा खासदार आहे. तथापि, चित्रपट कॉरिडॉरमध्ये तीची लोकप्रियता किंवा चर्चा कमी झालेली नाहीये. अनेकदा या सुंदर अभिनेत्रीशी संबंधित काही किस्से समोर येत राहतात.हेमा ने हिंदी चित्रपटसृष्टीतूून करिअरची सुरुवात ‘सपनो का सौदागर’ या चित्रपटातून केली. अशा परिस्थितीत तीला चेन्नई सोडून मुंबईला जावे लागलेेे होते.
सुमारे 52 वर्षांपूर्वी, तीच्या बरोबर एक विचित्र घटना घडली होती. जी तीने 2018 मध्ये उघड केली होती. मुंबईत तीला आणि तीच्या कुटुंबाला जुहू परिसरात राहण्यासाठी बंगला देण्यात आला. येथे राहत असताना हेमाला एका विचित्र समस्येमधून जावे लागले होते.
2018 मध्ये, अभिनेत्रीने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘सपनो का सौदागर’ च्या शूटिंग दरम्यान आम्ही अनंतस्वामींच्या घरी शिफ्ट झालो होतो, जे वांद्रे येथील मानवेंद्र अपार्टमेंटमध्ये होते. हा फ्लॅट खूप लहान होता, जो भानू अथैया अनेकदा ड्रेस ट्रायल साठी वापरत असे .
” हेमा पुढे म्हणाली, “नंतर आम्ही जुहूच्या एका बंगल्यात गेलो, जो 7 व्या रस्त्यावरील होता पण तो बंगला नंतर भूत बंगला बनला. प्रत्येक रात्री मला असे वाटत होते की कोणीतरी माझा ग’ळा दाबण्याचा प्रयत्न करत आहे. मला श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला होता. मी माझ्या आईबरोबर झोपायला सुरुवात केली आणि तिने देखील पाहिले की मी किती अस्वस्थ होत आहे.
हेमा पुढे म्हणाली, “जर माझ्याबरोबर अशा गोष्टी एकदा किंवा दोनदा घडल्या असत्या तर मी त्याकडे दुर्लक्ष केले असते. पण ही घटना माझ्याबरोबर रोज रात्री घडू लागली. म्हणून आम्ही आमचे स्वतःचे एक अपार्टमेंट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. ” यानंतर अभिनेत्रीने दुसरे घर घेतले होते.
अनेक हिट चित्रपट देणाऱ्या हेमाने 1980 मध्ये अभिनेता धर्मेंद्रसोबत लग्न केले. ती धरम जीची दुसरी पत्नी झाली. दोघांना ईशा आणि अहाना देओल या दोन मुली आहेत.