हेमा-धर्मेंद्रच्या लग्नात धर्मेंद्रच्या पहिल्या पत्नीची अवस्था झाली होती अशी,एका अटे वर झाले होते लग्न!!

धर्मेंद्र बॉलिवूडचा सुपरस्टार राहिला आहे, त्याने त्याच्या काळात अनेक हिट चित्रपट दिले आहेत. जेव्हा धर्मेंद्रने त्याची पहिली पत्नी प्रकाश कौरअसूनही, हेमा मालिनीशी दुसऱ्यांदा लग्न केले होते, तेव्हा त्याने बरीच प्रसिद्धी मिळवली होती. त्याला त्याच्या चाहत्यांच्या नाराजीलाही सामोरे जावे लागले होते. धर्मेंद्रचे पहिले लग्न प्रकाश कौर सोबत 1953 मध्ये झाले होते.

दोघांनी लग्न केले होते तेव्हा धर्मेंद्रने चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली नव्हती. त्याने ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून पदार्पण केले. 1970 मध्ये ‘तुम हसीन मैं जवान’ या चित्रपटाच्या सेटवर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते, हेमा आणि धर्मेंद्र यांनी मिळून जवळपास 25 चित्रपट केले आहे. धर्मेंद्र आधीच विवाहित असल्यामुळे हेमा मालिनीच्या कुटुंबाचा याला विरोध होता.

त्याला त्याच्या पहिल्या पत्नीपासून वेगळे व्हायचे नव्हते, म्हणून त्याने इस्लाम स्वीकारला, त्यानंतर त्याने हेमा मालिनीशी लग्न केले होते. धर्मेंद्रला त्याचे नाव बदलून दिलावर खान करावे लागले होते. हेमाशी लग्न करण्यापूर्वी धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांना अजय (सनी), बॉबी, व मुली अजेता आणि विजेता देओल अशी चार मुले होती.

धर्मेंद्रच्या दुसऱ्या लग्नानंतर एक वर्ष, त्याची पहिली पत्नी यावर काहीच बोलली नव्हती, पण एका वर्षानंतर एका मुलाखतीत प्रश्नाचे उत्तर देताना तीने सांगितले होते की, ‘तो पहिला आणि शेवटचा माणूस आहे ज्यावर मी प्रेम करते. मी त्यांचा खूप आदर करते. मी त्यांना दोष देऊ किंवा याला माझे नशीब समजू… मी नेहमीच त्यांच्यावर विश्वास ठेवीन, शेवटी ते माझ्या मुलांचा बाप आहेत.

याच मुलाखतीदरम्यान तिने हेमा मालिनीबद्दल खुलेपणाने सांगितले होते, प्रकाश कौर म्हणाली होती की, एक स्त्री असल्याने मी हेमाचा विचार केला पण तिने एकदा माझ्याबद्दलही विचार करायला हवा होता… आता मी स्वतःसाठी उभी होत आहे. पण मला स्वतःचे संरक्षण करण्याची गरज नाहीये. ‘जग काय म्हणते याची मला पर्वा नाही? जिथे मला काळजी वाटते तिथे माझे पती माझी काळजी घेण्यासाठी येतील.

दुसऱ्यांदा लग्न झाल्यानंतरही धर्मेंद्र आपल्या पहिल्या पत्नीला विसरला नाही आणि तिची बाजू सोडली नाही. त्याने हेमा मालिनीसोबत एक अट ठेवली होती की, तो आपली पहिली पत्नी आणि मुलांना सोडणार नाही, त्याची अट हेमा मालिनीने मान्य केली होती. तथापि, हे देखील सत्य आहे की त्याची मुले सनी आणि बॉबी त्यांच्या लग्नावर खुश नव्हते आणि असे म्हटले जाते की ते हेमा मालिनीशी भांडण्यासाठी पोहोचले होते…

Leave a Reply

Your email address will not be published.