देशभरात जसा गणेशोत्सव साजरा केला जातो अगदी तसाच तो बॉलिवूड स्टार्सच्या घरातही साजरा केला जातो. आजकाल सेलेब्सच्या घराचे दृश्य काहीसे वेगळे आहे, प्रत्येकजण आपल्या घरी बाप्पा आणतोय. कोरोनामुळे गणेशोत्सव फार धूमधडाक्यात साजरा केला जाऊ शकत नाहीये, परंतु बाप्पाचे भक्त त्याला घरी आणण्यात आनंदी आहेत.
दरवेळी प्रमाणे या वेळीही शिल्पा शेट्टी, नील नितीन मुकेश, गोविंदा आणि करीना कपूर खानसह अनेक स्टार्सनी बाप्पाचे स्वागत केले आहे. कोरोनामध्ये गरजू लोकांना मदत करणाऱ्या सोनू सूदनेही आपल्या घरातबाप्पाचे धूमधडाक्याने स्वागत केले आहे. सोनू गेल्या 20 वर्षांपासून आपल्या घरात अशाच पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतो. आहे, या चित्रांमध्ये सोनू आपल्या कुटुंबासह गणेश जीची आरती करताना दिसत आहे.
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही सोहेल खानच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. ही चित्रे त्याच्या घरी गणपती बाप्पाच्या स्थापनेच्या वेळेेची आहेत. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा बाप्पाच्या दर्शनासाठी सोहेल खानच्या घरी पोहोचले होते. यासोबतच त्याची बहीण अर्पितानेही तिच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना केली, व संपूर्ण कुटुंब या उत्सवात सामील झाले होते.
तथापि, भाऊ सलमान खान या कार्यक्रमात येऊ शकला नाही कारण तो सध्या त्याच्या टायगर 3 चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि बायो बबल अंतर्गत शूटिंग करत आहे. अलीकडेच, त्याच्या अंतीम चित्रपटातील विघ्नहर्ता हे गाणे देखील प्रदर्शित झाले आहे. करीना कपूर खानने तिच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना केली, एक चित्र पोस्ट करत तिने लिहिले आहे की – गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा…
सुपरस्टार गोविंदानेही गणेश जीचे त्याच्या घरी स्वागत केले आहे, या फोटोमध्ये तो आपली पत्नी सुनीता आणि यशवर्धन आहुजासोबत आपल्या घरात बाप्पाची पूजा करताना दिसत आहे. अजय देवगणनेही इन्स्टाग्रामवर लोकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. त्याने लिहिले आहे की भगवान गणेश सर्व चांगल्या गोष्टी, शांती, समृद्धी आणि प्रगतीचे दूत आहेत, त्यांचे हात जोडून स्वागत करा. गणपती बाप्पा मौरेया…
देशभरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे आणि पंडाल सजवले जात आहेत, परंतु यावेळी मुंबईत गणेशोत्सव साजरा होताना दिसणार नाही कारण मुंबईत 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान कलम 144 लागू करण्यात आले आहे. यामुळे, ना भाविकांना पंडालला जाता येणार आहे आणि ना कुठली मिरवणूक इथे निघू शकणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागलाा. कारण मुंबईत कोरोनाची प्रकरणे सतत वाढत आहेत.