सैफ अली खानने मेहुणी करिश्मा कपूरला दिली अशी एक भेट की अभिनेत्रीच्या…

सैफ अली खानच्या कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्याचीही खूप चर्चा आहे. कधी करीना कपूरसोबत तर कधी तैमूरसोबत तो चर्चेचा विषय बनतो. यावेळी तो त्याची मेहुणी करिश्मा कपूरला भेटवस्तू दिल्यामुळे चर्चेत आला आहे. करिश्मा कदाचित रील लाइफपासून दूर असेल पण ती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावर प्रत्येक अपडेट देत राहते.

ती व तीची बहीण करीना कपूर यांच्यातही एक सुंदर नाते आहे, दोघीही रोज एकत्र दिसतात. अलीकडेच सैफ अली खानने करिश्मा कपूरला एक भेटवस्तू दिली आहे, ती मिळाल्यानंतर करिश्मा इतकी खुश झाली की तिने ही भेट तिच्या चाहत्यांसह इन्स्टाग्रामवरही शेअर केली आहे.सैफने हा फोटो फ्रेम करिश्माला भेट दिला आहे.

या फ्रेमची खास गोष्ट म्हणजे या फोटोमध्ये करिश्मा आणि करीनाचे जुने एक चित्र आहे ज्यात दोघेही अगदी तरुण दिसत आहेत. हा फोटो त्यांच्या घरतील आहे असे दिसते ज्यात दोन्ही बहिणी त्यांच्या मोकळ्या वेळेचा आनंद घेत आहेत, चित्र एका खोलीचे आहे जिथे, सिडिज, पुस्तके व टेलिफोन समोर ठेवलेले दिसत आहे.

यामध्ये करिश्मा खुर्चीवर बसली आहे तर करीना कपूर सोफ्यावर आरामात बसलेली आहे. हा फोटो पोस्ट करत करिश्माने कॅप्शन लिहिले आहे की ‘थँक्स सैफू, ही एक अविस्मरणीय आठवण आहे मी ही फ्रेम लटकण्याची वाट पाहू शकत नाहीये, मला ते खूप आवडले. या पोस्टला आतापर्यंत 1 लाख 70 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

करिश्मा आणि करीनाची मैत्री इतकी खोल आहे की दोघीही एकत्र पार्टी करताना दिसतात, मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांचाही त्यांच्या फ्रेंड लिस्टमध्ये समावेश आहे ज्यांच्यासोबत त्या अनेकदा चील करतात. करिश्मा आता चित्रपट जगतापासून दूर असेल, पण तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

तिने सैफ अली खानसोबत हम साथ साथ हैं, बीबी नंबर 1, ओम शांति ओम, बॉम्बे टॉकीज, ये दिल लगी यासह अनेक चित्रपट केले आहेत. सैफ अली खान आजकाल खूप व्यस्त आहे, त्याची वेब सीरिज तांडव आणि जवानी जानेमन चित्रपट काही महिन्यांपूर्वी आला होता, आता तो आदिपुरुष चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.