सुशांतच्या मृत्यूच्या 1 वर्षानंतर आता अंकिता लोखंडे अडकणार विविह बंधनात!!

‘पवित्र रिश्ता’ द्वारे टीव्हीच्या जगात मोठी छाप पाडणारी अंकिता लोखंडे सध्या अभिनेता शाहीर शेखसोबत तिच्या आगामी पवित्र रिश्ता 2.0 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. होय, चाहते देखील या शोच्या प्रारंभाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि अलीकडेच अंकिता आणि शाहीर यांनी एका मुलाखतीत या शोबद्दल बरेच काही सांगितले आहे. पण या चर्चेत शाहीरने अंकिता आणि विकी जैनच्या लग्नाचे रहस्य उघड केले आहे.

पवित्र रिश्ता 2.0′ चा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि त्याचा प्रीमियर 15 सप्टेंबर रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत शोची मुख्य अभिनेत्री अंकिता लोखंडे खूप चर्चेत आली आहे. मुलाखतीदरम्यान अंकिता लोखंडेला विचारण्यात आले होते की ‘पवित्र रिश्ता’ नंतर कोणत्या कार्यक्रमात किंवा तू काय करताना दिसशिल. यावर उत्तर देताना अंकिता लोखंडे हसली आणि म्हणाली, यानंतर माझ्याकडे काही विशेष करन्यासारखे नाहीये.

दुसरीकडे, शाहीर शेख अंकिता लोखंडेच्या बोलण्यावर स्वतःला रोखू शकला नाही आणि तिच्या लग्नाबद्दल बोलत बसला. शाहीर शेखने अंकिता लोखंडेला अडवले आणि म्हणाला, “अरे तू लग्न करणार आहेस, ना?” शाहीर शेखचे शब्द ऐकून अंकिता हैराण होते आणि ती लगेच त्याला गप्प करू लागते. शाहीर शेखला शांत करत असताना ती म्हणाते की, “तू वेडा आहेस का? गप्प बस, असे काही नाहीये.

अंकिता लोखंडे, तिच्या प्लॅनबद्दल बोलताना पुढे म्हणाली की, “सध्या मी शो नंतर काहीही करत नाहीये. पण फेब्रुवारी महिन्यात मी नक्कीच काहीतरी सुरू करणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून अंकिता लोखंडे विकी जैनला डेट करत असल्याची माहिती आहे. यावर्षी बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत तीने आपल्या लग्नाबद्दलही चर्चा केली होती.

त्याच वेळी अंकिता लोखंडे म्हणाली होती की, “लग्न ही एक सुंदर गोष्ट आहे. मी माझ्या लग्नाची वाट पाहत आहे जे लवकरच होणार आहे आणि खरं तर मला जयपूर-जोधपूर राजस्थानी विवाह खूप आवडतात. पण मी निश्चितपणे सांगू शकत नाही की मी काय प्लॅन करणार आहे.विकीला भेटण्यापूर्वी अंकिता दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला डेट करत होती आणि हे दोन्ही स्टार्स पवित्र रिश्ताच्या सेटवर भेटले होते.

यावर्षी सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त अंकिताने सोशल मीडियावर अनेक न पाहिलेली छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर करून त्याला श्रद्धांजली वाहिली. तसेच तीने विकीसाठी एक लांब नोटही लिहिली होती, ज्यामध्ये तीने विकीने तीच्या कठीण काळात साथ दिल्याबद्दल त्याचे आभार मानले..

Leave a Reply

Your email address will not be published.