टीव्ही इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता आणि रिअॅलिटी शो बिग बॉसचा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, दरम्यान आता सिद्धार्थचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. कूपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी हा अहवाल ओशिवारा पोलीस ठाण्यात सादर केला आहे. सिद्धार्थचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
2 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास कूपर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सिद्धार्थला मृ’त घोषित केले. सिद्धार्थचे पोस्टमॉ’र्टम दुपारी 3.30 च्या सुमारास सुरू झाले आणि सकाळी 8.30 वाजता संपले, 5 डॉक्टरांनी सिद्धार्थच्या पोस्टमॉ’र्टम रिपोर्टवर सही केली. सिद्धार्थचे पोस्टमॉर्ट’म 3 डॉक्टरांनी केले.
अहवालानुसार, सिद्धार्थच्या श’रीरा’वर कोणत्याही ज’ख’माच्या खु’णा नाहीत आणि फॉरेन्सिक अहवाल आणि रासायनिक वि’श्लेषणानंतरच मुंबई पोलिस निष्कर्षावर येतील. व्हि’से’रा नमुना कालीच्या न्या’यवै’द्यक प्रयोगशाळेकडे पाठवला जाईल. या अहवालासाठी सूमारे 20-25 दिवस लागतील. व्हि’सेरा अहवाल आल्यानंतरच मृ’त्यूचे नेमके कारण कळेल. विशेष म्हणजे, अहवालात सिद्धार्थच्या मृत्यूबाबत कोणतीही शंका व्यक्त करण्यात आली नाहीये.
त्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका होता. त्याच्या मृत्यूवर कुटुंबीयांनी कोणतीही चिंता व्यक्त केलेली नाही,तसेच त्यांना कोणाविरुद्धही शंका नाहीये. सिद्धार्थांचे अंतिम संस्कार ओशिवरा स्मशानभूमीत झाले. त्यानेे त्याच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी बुधवारी जेवण केले नव्हतेे, पण त्याने रात्री ताक आणि फळे खाल्ली होती. यानंतर त्याने टीव्ही आणि मोबाईल फोनवर शो पाहिले.
टीव्ही स्टार बनण्यापूर्वी सिद्धार्थ शुक्ला मॉडेलिंगच्या दुनियेत एक प्रसिद्ध नाव आहे. काही वेळापूर्वीच तो “ब्रोकन बट ब्यूटीफुल” वेब सीरिजमध्ये दिसला होता. सिद्धार्थची फॅन फॉलोइंगही खूप चांगली होती. या दिवसात तो आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर चढत होता. त्याने अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
12 डिसेंबर 1980 रोजी मुंबईत जन्मलेल्या सिद्धार्थने मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली. सिद्धार्थ शुक्लाचा टीव्ही शो बालिकाला अधिक लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. तो दिल से दिल तक या मालिकेतही दिसला होता. त्याने हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.