अभिनेत्री राखी सावंतच्या खुलास्याने हादरले बॉलिवूड,म्हणाली- “सिद्धार्थ चा मृत्यू हृदयविकाराने नाही तर….

छोट्या पडद्यापासून बॉलिवूड चित्रपटांपर्यंत आपली छाप पाडणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आता आपल्यात नाहीये. ‘बिग बॉस 13’ विजेता सिद्धार्थच्या अचानक मृत्यूची बातमी समोर आली. ज्याने सर्वांना हादरवून सोडले. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर त्याचे चाहते आणि स्टार्स सतत त्याला सोशल मीडियावर पोस्टद्वारे श्रद्धांजली देत आहेत.

अभिनेत्याच्या मृत्यूच्या कारणाबाबत पोलीस आणि सिद्धार्थच्या कुटुंबीयांकडून कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाहीये. पण या दरम्यान अभिनेत्री राखी सावंतने एका व्हिडिओद्वारे एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंत सिद्धार्थच्या मृत्यूबद्दल बोलताना दिसत आहे. आज सिद्धार्थ शुक्लचे निधन होऊन जवळपास 5 दिवस झाले आहेत.

2 सप्टेंबर रोजी त्याने या जगाचा निरोप घेतला. टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे त्याचे जवळचे आणि प्रियजनच केवळ अस्वस्थ झाले नाहीत तर संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला धक्का बसला आहे आणि अभिनेत्याच्या अकाली निधनामुळे बरेच लोक तुटले गेेले आहेत. त्याचे मित्र आणि प्रियजन त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी सतत प्रार्थना करत आहेत.

त्याचवेळी, त्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका म्हणून देण्यात आले आहे. तसेच अशा परिस्थितीत, काहीतरी चुकीचे आहे असा संशय अनेकांना येत आहे. होय, कमल रशीद खाननंतर आता राखी सावंतनेही एक व्हिडिओ बनवला आहे आणि या व्हिडिओमध्ये राखी सावंतने धक्कादायक दावे केले आहेत.

राखी सावंतने सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूसंदर्भात एक व्हिडिओ बनवला, ज्यात ती सिंदूर लावलेली दिसत आहे. तीने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “नमस्कार मित्रांनो, मी अजूनही घरी आहे, मी कुठेही बाहेर जाऊ शकत नाहीये. सिद्धार्थच्या मृत्यूने मी खूप हादरले आहे, पण आत्ताच कळले की आहे की सिद्धार्थलय हृदयविकाराचा झटका आला नव्हता, मग तो कसा मेला. हे सर्व शोधण्यासाठी बर्‍याच गोष्टी तपासासाठी पाठवल्या गेल्या आहेत, मी खूप काळजीत आहे. ”

एवढेच नाही तर सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यू प्रकरणावर राखी सावंत पुढे म्हणाली की, “त्याच्या बीएमडब्ल्यू कारच्या काचाही तुटल्या होत्या, कोणाशी भांडण झाले होते? असे म्हटले जाते की आठ ते साडेआठच्या दरम्यान तो कुणाला तरी भेटायला गेला आणि नंतर घरी आला आणि की त्याची तब्येत ठीक नाहीये, मग रात्री तीन वाजता सांगितले की माझी तब्येत ठीक नाही. मग काही औषध घेतले, ते औषध काय होते? इमारतीत भांडण झाले होते. त्याच्या कारच्या काचा फुटल्या होत्या.

अरे देवा, सत्य काय आहे? काही दबाव होता का, ज्यामुळे भांडण झाले, कोणते औषध घेतले होते. केवळ डॉक्टरच या गोष्टी सांगू शकतात. हे सर्व चाहत्यांना, मला आणि देशातील लोकांना जाणून घ्यायचे आहे? हे ऐकून मला खूप चक्कर येते की. जर हा हृदयविकाराचा झटका नव्हता तर काय होते? हा व्हिडिओ पोस्ट करताना राखी सावंतने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मित्रांनो, मला धक्का बसला आहे! हे लोक सांगत आहेत की हृदयविकाराचा झटका आला नाही? मला कूपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून जाणून घ्यायचे आहेे.

Leave a Reply

Your email address will not be published.