बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय हि हिंदी चित्रपटसृष्टीची एक अतिशय सुंदर अभिनेत्री मानली जाते, तसेच आता ऐश्वर्या राय चित्रपटांमध्ये कमी दिसते, 90 च्या दशकाच्या उत्तरार्धात ऐश्वर्या रायने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आणि अगदी कमी वेळात लोकांच्या हृदयावर राज्य करण्यास सुरुवात केली. तिच्या सौंदर्याने सर्वांची मने जिंकली होती.
ऐश्वर्या रायच्या सौंदर्याची चर्चा आजही होत आहे. ऐश्वर्या तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच तिच्या पर्सनल लाईफबद्दलही खूप चर्चेत राहिली आहे. ऐश्वर्या रायच्या सलमान खानसोबतच्या नात्याने बरीच प्रसिद्धी मिळवली होती. परंतू दोघेे वेगळे झाले होते. विवेकनंतर ऐश्वर्याचे हृदय अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनवर आले.
दोघांनी एकत्र काम केले आणि या दरम्यान हेे दोघे जवळ आले.काही काळानंतर दोघांनी 2007 साली लग्न केले, अभिषेकशी लग्न करण्यापूर्वीच ऐश्वर्या रायनेे लग्न केेले होते. ऐश्वर्या राय आणि अभिषेकच्या लग्नापूर्वी असे सांगितले गेले होते की ऐश्वर्या राय मांगलिक आहे. पंडित आणि विद्वान दोघेही तीच्या लग्नाबद्दल बरेच काही बोलले होते.
दरम्यान, असेही म्हटले जात होते की ऐश्वर्या रायने प्रथम पिंपळ, नंतर अभिषेक बच्चनशी लग्न केले होते. असे म्हटले जाते की ऐश्वर्या रायने मांगलिक दोष सुधारण्यासाठी असे केले होते. अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नापूर्वी अमिताभ बच्चन यांचे संपूर्ण कुटुंब आपल्या सूनला काशीला घेऊन गेले होते. इथे सर्वांना काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग आणि संकेत मोचनचे दर्शन मिळाले.
तसेच संकेत माध्यमांमध्ये बातम्या आल्या होत्या की, ऐश्वर्याने येथे पिंपळाच्या झाडाशी लग्न केले. दुसरीकडे, या संकट मोचन मंदिराचे अर्चक, श्रीकांत मिश्रा यांनी एक मोठे विधान केले होते की बच्चन कुटुंब केवळ दर्शन घेण्यासाठी आणि देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आले होते. म्हणजेच ऐश्वर्याने पिंपळाच्या झाडाशी लग्न केले नाहीये, फक्त असे अंदाज बांधले जात होते.
यानंतर एप्रिल 2007 मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले. या लग्नात बॉलिवूडचे मोठे सेलिब्रिटी सहभागी झाले होते. लग्नाच्या 4 वर्षानंतर त्यांची मुलगी आराध्याचा जन्म नोव्हेंबर 2011 मध्ये झाला. तर असे वृत्त येत आहेत की दुसऱ्यांदा ऐश्वर्या राय सर्वांना आनंदाची बातमी देणार आहे. या फोटोमध्ये तिचे बेबी बंप दिसत आहे.
ऐश्वर्या रायने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, 1994 मध्ये ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा मुकुट जिंकला. तिच्याशी संबंधित एक विशेष गोष्ट अशी आहे की ती पहिली भारतीय अभिनेत्री आहे जीचा मेणाचा पुतळा लंडनमधील मादाम तुसाड म्यूजियम स्थापित केला आहे. तर त्याच वेळी, भारत सरकारने तीच्या उत्कृष्ट कार्याबद्दल तीला 2009 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.