हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी या वर्षी 7 जुलै रोजी जगाला निरोप दिला. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांनी हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांनी वयाच्या 98 व्या वर्षी हे जग सोडले. त्यांनी आपल्या मागे पत्नी सायरा बानो आणि सुमारे 600 कोटी रुपयांची संपत्ती सोडली आहे.
लग्नापासून दिलीप कुमार यांच्या मृत्यूपर्यंत सायरा सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत राहिली. प्रत्येक सुख -दुःखात सायरा नेहमी दिलीपच्या खांद्याला खांदा लावून उभी असायची. मात्र, जेव्हा दिलीप कुमार हे जग सोडून गेले तेव्हा सायरा बानो पूर्णपणे तुटली होती. आताही तीला दिलीपची खूप आठवण येते आणि आता तीचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे.
असे सांगितले जात आहे की, दिलीप कुमारच्या मृत्यूनंतर सायरा उदास तसेच तणावात देखिल आहे, आणि यामुळे तीच्या आरोग्यावरही परिणाम झाला आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सायरा मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल आहे. तीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून तीची प्रकृती खुप बिकट आहे. जेव्हा तीची तब्येत बिघडली, तेव्हा सायराने ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना फोन केला आणि त्यांना सांगितले की तिला बरे वाटत नाहीये.
धर्मेंद्र दिलीप कुमार यांना आपला मोठा भाऊ मानत होता आणि सायराच्या तब्येतीबद्दल तो खूप काळजीत आहे. धर्मेंद्र यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की, चार दिवसांपूर्वी फोनवर सायरा बानोशी त्यांचे संक्षिप्त संभाषण झाले. धर्मेंद्रने सायराला फोन केला होता पण तिने फोन उचलला नाही. यानंतर मिस कॉल पाहून सायराने धरम जीला फोन केला.
धर्मेंद्रने सांगितले की, ‘ती माझा फोन उचलू शकत नव्हती, म्हणून तिने परत फोन केला आणि मला सांगितले की माझी तब्येत ठीक नाहीये.’ धर्मजींनी मुलाखतीत पुढे सांगितले आहे की, ‘मी जास्त काही बोललो नाही पण दिलीप कुमारच्या मृत्यूनंतर तिला कसे वाटत असावे हे तुम्ही समजू शकता.
सायराला श्वासोच्छवासाची समस्या, रक्तदाब वाढणे आणि साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ताज्या बातम्यांनुसार, अभिनेत्रीची अँजिओग्राफी केली जाईल. तीच्या हृदयाच्या डाव्या वेंट्रिकुलरमध्ये अडथळा आला आहे, ज्यावर लवकरच अँजिओग्राफीद्वारे उपचार केले जातील.