एव्हडे किलोमीटर पायी प्रवास करून या प्रसिद्ध क्रिकेट पट्टूने घेतला माता वैष्णव देवीचा आशीर्वाद!!

भारतीय क्रिकेट संघाचा ओपनर शिखर धवन माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी कटरा येथे पोहोचला. तसेच त्याचे कुटुंबही त्याच्यासोबत होते. या दरम्यान शिखर धवनने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना आपल्या लहानपणीच्या आठवणी शेअर केल्या आहेत. त्याने लिहिले आहे की, मला माझे लहानपणीचे दिवस आठवतात जेव्हा माझे वडील मला इथे आणायचे. पण यावेळी माझ्या वडिलांना वैष्णोदेवीचे दर्शन करताना पाहून मला खूप छान वाटले.

तसेच चाहत्यांमध्ये गब्बर म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिखर धवनने पुढे लिहिले आहे की, हा प्रवास लहानपणीसारखा खूप मजेदार होता, वाटेत उसाचा रस आणि मॅगीचा आनंद घेतला. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. एक विशेष अनुभव, कुटुंबासोबत राहून आणखी खास बनला. सध्या, श्रीलंकेत व्हाईट बॉल मालिकेनंतर धवन आपल्या कुटुंबासह दर्जेदार वेळ घालवत आहे. पण, लवकरच इंडियन प्रीमियर लीगच्या 2021 हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी तो दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील होण्यासाठी यूएईला रवाना होईल.

आयपीएल -2021 च्या पूर्वार्धात धवनने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याच्या 8 सामन्यांमध्ये 54.29 च्या सरासरीने 380 धावा आहेत. दुसरीकडे, त्याचा संघ 8 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वल आहे. गुरुवारी, त्याने इंस्टाग्रामवर वैष्णो देवी यात्रेची काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत, ज्यामध्ये शिखर वैष्णो देवीवर चालताना दिसत आहे. यानंतर 6 लाखांहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे आणि वीरेंद्र सेहवागसह अनेक लोक जय माता दी अशा कमेंटही करत आहेत.

एवढेच नाही, जेव्हा वैष्णो देवी यात्रेदरम्यान सुमारे 14 किलोमीटरचा प्रवास करताना शिखर धवनला थोडा थकवा जाणवला, तेव्हा तो तेथील एका दुकानावर थांबला आणि उसाचा रस ही पिला. या चित्रात पहा की गब्बर कसा उभा आहे रसाची वाट पाहत आहे. शिखर धवनचा स्वॅग कोणत्याही स्टारपेक्षा कमी नाहीये. आता या चित्रातच बघा, भारतीय संघाचा गब्बर डोक्यावर कॅप, चष्मा आणि पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घालून अतिशय स्टायलिश दिसत आहे.

एवढेच नाही तर धवनला माता वैष्णो देवीच्या दरबारात पाहून चाहत्यांनी त्याच्यासोबत सेल्फी आणि छायाचित्रे काढण्याची स्पर्धा लावली होती. कटरा येथे त्याच्या आगमनाची माहिती मिळाल्यानंतर अनेक लोक त्याला भेटण्यासाठी त्याच्या हॉटेलबाहेर पोहोचले होते. यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. वैष्णो देवी धाम येथे श्राइन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनीही धवनची भेट घेतली.

शिखर धवनचा देवी -देवतांवर खूप विश्वास आहे, याआधी तो या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर बनारसला पोहोचला होता आणि गंगा मैयाची आरतीही केली होती. शेवटी, वैष्णो देवी माता दर्शनासाठी कटरा येथे पोहोल्यवर शिखर धवन म्हणाला की, आई वैष्णो देवीने त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत आणि मी माझ्या मनातील काही इच्छा देवीला सांगणार आहे, म्हणून मी प्रवास पायी करत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published.