दिलीप कुमारच्या मृत्यूनंतर 1 महिन्यानंतर आता पत्नी सायराबानोची बिघडली प्रकृती,आयसीयूमध्ये दाखल!!

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानोच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. सायरा बानो हिंदी सिनेमाचा ट्रॅजेडी किंग दिलीप कुमारची पत्नी आहे. दिलीप कुमारचे या वर्षी जुलैमध्ये निधन झाले. तेव्हापासून सायरा बानो बातम्यांपासून दूर आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, दिलीप कुमारच्या मृत्यूनंतर सायरा बानोची तब्येत बिघडली आहे. बुधवारी तीच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने 1 सप्टेंबर रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले आहे. कमी रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळी कमी असल्यामुळे सायरा बानोला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्रीला श्वास घेण्यास त्रास होत होता.

दुसरीकडे, सायरा बानोच्या प्रकृतीची माहिती होताच, तीचे चाहते तिच्या लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच दिलीप कुमारचे 7 जुलै रोजी निधन झाले आहे. ते 98 वर्षांचे होते. सायरा बानो त्यांच्या निधनानंतर भावनिकदृष्ट्या तुटलेली आहे. दिलीप कुमार यांचे वयाच्या 98 व्या वर्षी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. ते बराच काळ आजारी होते.

सायरा बानो हिंदी चित्रपटसृष्टीतील अव्वल अभिनेत्री राहिली आहे. आपल्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीत तिने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आणि हिट चित्रपट दिले. सायरा बानो हिने हिंदी सिनेमाचे ट्रॅजेडी किंग दिलीप कुमारसोबत लग्न केले. सायरा बानोचा जन्म 23 ऑगस्ट 1944 रोजी उत्तराखंडच्या मसूरी येथे झाला. सायरा बानोने वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. 1961 मध्ये जंगली हा तिचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात सायरा बानोसोबत ज्येष्ठ अभिनेता शम्मी कपूर मुख्य भूमिकेत होता.

Leave a Reply

Your email address will not be published.