आपल्या मागे एव्हड्या कोटींची संपत्ती सोडून गेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला,काही महिन्यांपूर्वी घेतलेलं स्वप्नांचं घर…

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं नुकतंच निधन झालं. सिद्धार्थच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला आहे. ‘बिग बॉस १३’ मधून लोकप्रियता मिळवणारा सिद्धार्थ कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक होता.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं आज २ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मुंबईतील कूपर इस्पितळात सिद्धार्थला मृत घोषीत करण्यात आलं. सिद्धार्थच्या जाण्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.

‘बिग बॉस १३’ मधून सिद्धार्थला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्याच्या अशा अचानक निधनाने कलाकारांकडूनही शोक व्यक्त केला जात आहे. सिद्धार्थने छोट्या पडद्यावर उत्कृष्ट अभिनय करून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं होतं. मालिकांमधून लोकप्रियता मिळवणारा सिद्धार्थ कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक होता.

सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराने निधन, झोपेतच घेतला अखेरचा श्वास
‘बालिका वधू’ मालिकेतील शिवच्या भूमिकेसाठी सिद्धार्थचं प्रेक्षकांकडून कौतुक झालं होतं. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थकडे इतर छोट्या पडद्यावरील अभिनेत्यांच्या तुलनेत जास्त संपत्ती होती. २०२० पर्यंत सिद्धार्थची एकूण संपत्ती ११ कोटींच्या आसपास होती.

जी एक छोट्या पडद्यावरील अभिनेत्याच्या मानाने जास्त आहे. सिद्धार्थची कमाई टीव्हीवरील मालिका आणि मोठमोठ्या ब्रॅण्डच्या जाहिरातींमधून होत होती. सिद्धार्थ जसा कमावत होता तसा तो दान धर्मदेखील करत होता. सिद्धार्थ नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असायचा.

सिद्धार्थने नुकतंच मुंबईत त्याच्या स्वप्नांचं घर विकत घेतलं होतं. या घरात तो त्याच्या कुटुंबासोबत राहत होता. शिवाय सिद्धार्थला महागड्या गाड्यांची देखील हौस होती. सिद्धार्थकडे एक बीएमडब्ल्यू एक्स ५ आहे. सोबतच एक हार्ले-डेविडसन फॅट बॉब बाइक देखील आहे.

सिद्धार्थला नेहमीच साधं राहायला आवडायचं. दिखावा करणं त्याला आवडत नसे. बिग बॉस चा विजेता झाल्यानंतर सिद्धार्थच्या जीवनाला एक वेगळं वळण मिळालं होतं. सिद्धार्थची ‘ब्रोकन बट ब्युटीफुल’ वेब सीरिजही नुकतीच प्रदर्शित झाली होती. सिद्धार्थच्या जाण्याने सिनेसृष्टीत दुःखाचं वातावरण पसरलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.