बॉलिवूडवर पसरली शोककळा,अवघ्या 40 व्या वर्षी या प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप!!

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. हृदय विकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं आहे. सिद्धार्थच्या अचानक निधनामुळे त्याच्या चाहत्यांना आणि कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईच्या कूपर रूग्णालयात त्याचं निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थने रात्री झोपण्यापूर्वी काही औषध खाल्लं होतं. त्यानंतर सिद्धार्थ पुन्हा उठलाचं नाही. रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉतक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

सिद्धार्थ शुक्ला आपली बॉडी फिट ठेवण्यासाठी दररोज जिम कराचये. त्याने अनेक इंटरव्यू दरम्यान सांगितले होते की जिमसोबत तो आपल्या डायटकडे पूर्णपर्ण लक्ष ठेवत होता. दररोज सकाळी ब्रेकफास्टमध्ये अंडी खात होता. जिममध्ये एक्सरसाइज करताना सिद्धार्थ दररोज कार्डियो देखील करत होता.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी काही औषधं खाल्ली होती. यानंतर सकाळी तो झोपेतून उठलाच नाही. त्याला सकाळी इस्पितळात नेले असता मृत घोषित करण्यात आले. यावेळी झोपेतच हार्ट अटॅकने त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे.

सिद्धार्थ आपल्या आईची खूप लाडका होता. त्याला आईच्या हाताने तयार जेवण खूप आवडायचं. सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीमुळे मनोरंजन जगात शोक पसरला आहे. कोणालाही विश्वासच बसत नाहीये की सिद्धार्थने अचानक या जगाचा निरोप घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.