मुलाला परदेशी पाठवून घरी रडत बसली आहे अभिनेत्री मलायका, म्हणातीये- मी प्रयत्न….

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोराचा मुलगा अरहान खान उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला आहे. अलीकडेच मलायकाने स्वतः अरहानसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना हा खुलासा केला आहे. अरहानला परदेशात जाऊन जवळपास दोन आठवडे झाले आहेत. मलायका अनेकदा तिच्या मुलाला मिस करत असते.

‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना मलायका म्हणाली, हे खूप कठीण आहे, पण मी अजूनही अरहान आसपास नसतानाही जगण्याचा प्रयत्न करत आहे. खरं सांगायचं झालं तर, मला वाटत नाही की मला या गोष्टीची कधी सवय होईल ‘. मलायका जेव्हा तिच्या मुलाला इंस्टाग्रामवर परदेशात जाण्याविषयी बोलली होती तेव्हा तिने एक भावनिक संदेशही लिहिला होता.

मुलाला फेरवेल देताना मलायका खूप भावूक झाली होती. तिने लिहिले होते की, ‘अरहानला गूड बाय करणे माझ्यासाठी सर्वात कठीण आहे’. यासह, तीने कॅप्शनमध्ये असेही लिहिले होते की – ‘जसे आपण एका नवीन आणि अज्ञात प्रवासाला निघण्यापूर्वी, आपण, भीती, उत्साह, अंतर आणि नवीन अनुभवांनी भरलेले असतो. मला एवढेच माहीत आहे की मला माझ्या अरहानचा अभिमान आहे.

तुझी पंख पसरवण्याची वेळ आली आहे. उडणे, उंच उड्डाण घेणे, सर्व स्वप्ने जगणे, मी तुला आधीपासूनच मिस करत आहे. 18 वर्षीय अरहान खान अभिनेता अरबाज खानचा मुलगा आहे. मलायका व अरबाज खान यांचा लग्नाच्या 19 वर्षानंतर 2017 मध्ये घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अरहानचा ताबा मलायकाच्या हातात आला.

मलायका अनेकदा अरहानसोबत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. मलायकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच एमटीव्ही सुपरमॉडेल ऑफ द इयर सीझन 2 मध्ये दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.