जेव्हा या दिग्दर्शकाने माधुरीला घातली होती ‘गरोदर राहणार नाही’ अशी अट.. इतक्या वर्षांनी माधुरीने केला गौप्यस्फोट..

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षितने नुकताच 54वा वाढदिवस साजरा केला. माधुरी दीक्षित हिंदी चित्रपटसृष्टीतील अशी नायिका आहे. तिच्या अभिनय आणि स्टाईलमुळे आजही लाखो लोक तिच्यावर फिदा आहेत.

तिने कदाचित आपल्या कारकीर्दीची सुरुवात फ्लॉप चित्रपटाने केली असेल, पण चांगल्या कलाकारांचं यश फार दूर असू शकत नाही. तेजाब, राम लखन, परिंदा, साजन, खलनायक, दिल, सोन, हम आपके हैं कौन, दिल तो पागल है, लज्जा, पुकार, देवदास अशा चित्रपटांमधील माधुरीच्या अभिनयाने सर्वांची मन जिंकली.

‘तेजाब’ चित्रपटाने माधुरीचे नशिब बदललं. 1988च्या चित्रपटात तिने मोहिनीची भूमिका साकारली होती. 90च्या दशकात माधुरीला टॉप अॅक्ट्रेस म्हणून ओळख मिळाली होती. आज आम्ही तुम्हाला माधुरी दीक्षितच्या करियरशी संबंधित एक रंजक किस्सा सांगणार आहोत.

माधुरीने 1984च्या ‘अबोध’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता, मात्र तिला चार वर्षांनंतर ‘तेजाब’ चित्रपटातून ओळख मिळाली. आणि मग माधुरीने मागे कधी वळून पाहिलंच नाही. संजय दत्त आणि माधुरी दीक्षित ही हिंदी सिनेमातील प्रसिद्ध जोडी खूपकाळ टिकून होती. या दोघांनी ‘खलनायक’ ते ‘महात्मा’ पर्यंत अनेक चित्रपट केले.

90च्या दशकात त्यांच्या अफेअरचीही चर्चा जोरात सुरू होती. अशा परिस्थितीत माधुरीला तिचं यश कायम टिकवण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली. एका वृत्तानुसार, कुमारी असूनही माधुरी दीक्षितला ‘नो प्रेग्नेंसी’ या क्लॉजवर सही करावी लागली. त्यावेळी माधुरीची स्टारडम होती आणि तिचे जवळजवळ प्रत्येक चित्रपट हिट होत होते.

माधुरी आणि संजयचा आलेला प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवरही हिट होत होता. खरंतर माधुरी आणि संजय यांच्यात जवळीक लक्षात घेता चित्रपट निर्मात्यांमध्ये एक विचित्र भीती निर्माण झाली होती. त्यांना वाटतं होतं की, या दरम्यान माधुरीने लग्न केलं तर, ती प्रेग्नंट झाली तर? असे प्रश्न निर्मांत्यांच्या मनात येवू लागले.

त्यावेळी संजय दत्तचं लग्न झालं होतं, मात्र त्यावेळी त्याची पत्नी परदेशात होती, त्यामुळे संजय दत्त आणि माधुरी बहुतेक वेळ एकत्र घालवत असतं आणि तासंतास एकत्र राहत. दोघांच्या अफेअरची चर्चा बॉलिवूडच्या कॉरिडोरमध्ये सामान्य होती आणि हे पाहून दिग्दर्शक सुभाष घई देखील घाबरले होते

ते ‘खलनायक’ चित्रपटात माधुरीबरोबर काम करत होते. सुभाष घईना वाटलं की, जर माधुरीने चित्रपटाच्या मधेच लग्न केलं किंवा ती प्रेग्नंट झाली तर तिचा चित्रपट मध्यभागी थांबेल. असा विचार करून सुभाष घई यांनी माधुरीला ‘नो प्रेग्नेंसी’ या क्लॉजवर सही करायला लावली.

त्यानुसार, या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान माधुरी गर्भवती राहिली तर तिला दंड भरावा लागेल. नायिकेबरोबर असा करार करणारे सुभाष घई हे पहिले दिग्दर्शक होते.

Leave a Reply

Your email address will not be published.