( Stepmom )सावत्र आई हेमा ,धर्मेंद्रच्या मुलांच्या आशेवर बसली होती,परंतू सनी आणि बॉबी देओलने केली निराशा!!

धर्मेंद्रने दोन विवाह केले आहेत. हेमा मालिनी त्याची दुसरी पत्नी आहे. धर्मेंद्रला हेमाकडून दोन मुली आहेत – ईशा देओल आणि अहाना देओल. सनी देओल आणि बॉबी देओल हे धर्मेंद्रची पहिली पत्नी प्रकाश कौरचे मुलगे आहेत. एकदा हेमा मालिनीने सनी आणि बॉबी देओलबद्दल माध्यमांमध्ये असा दावा केला होता की, तीच्या दोन्ही सावत्र मुलांनी तीची इच्छा अपूर्ण सोडली होती.

हे संपूर्ण प्रकरण 2014 सालचे आहे. त्यानंतर 2 फेब्रुवारीला हेमा मालिनीची धाकटी मुलगी अहाना देओलचे लग्न होणार होते. हेमा मालिनीने दावा केला होता की सनी आणि बॉबी देओल तिच्या धाकट्या मुलीच्या लग्नात नक्कीच उपस्थित राहतील. ती तिच्या दोन मुलांची वाट पाहत होती.

मात्र, हेमा मालिनीची मोठी मुलगी ईशाच्या लग्नाला ते दोघेही आले नव्हते. त्यानंतर अभय देओलने ईशाच्या लग्नात भावाचे विधी पार पाडले. हेमा मालिनी नेे स्पष्ट केले होते की, ईशाचे लग्न होत असताना, तिचे दोन्ही सावत्र मुले देशाबाहेर शूटिंगमध्ये व्यस्त होते. म्हणूनच ते येऊ शकले नाहीत.

धर्मेंद्र ने पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच हेमा मालिनीसोबत दुसरे लग्न केले होते. यादरम्यान कुटुंबात बराच गोंधळ झाला होता. तसेच लग्नानंतर बरीच वर्षे सनी आणि बॉबी त्यांच्या सावत्र आईशी बोलले नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published.