मोठ्या पडद्यावर आपण अनेकदा बहिण-भावंडाची रोल करताना अनेक अभिनेता व अभिनेत्रीला पाहिले असेल. मात्र, प्रत्यक्षात त्यांचे बहिण भाऊ हे वेगवेगळे असतात. खऱ्या आयुष्यामध्ये देखील त्यांचे आयुष्य कसे असते हे अनेकांना जाणून घेण्याची उत्सुकता असते.
मात्र, अनेकदा आपल्याला ही माहिती उपलब्ध होत नाही. बॉलिवूडमध्ये काही कलाकार असे आहेत की, ज्यांचे बहिण-भाऊ त्यांना माहिती असतात. मात्र, यांच्या बद्दल अधिक माहिती नाही. त्यांच्याबद्दल आम्ही आपल्या या लेखांमध्ये माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
1) सनी देओल-ईशा देओल– बॉलीवूड मध्ये देओल घराणे हे खूप मोठे आहे. धर्मेंद्र यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये दोन लग्न केले आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीपासून त्यांना सनी देओल, बॉबी देओल हे मुलं आहेत. तर त्यांनी दुसरे लग्न हे अभिनेत्री हेमामालिनी यांच्या सोबत केले आहे.
त्यांना ईशा देओल, आहाना देओल ही मुलं आहेत. खऱ्या आयुष्यामध्ये सनी देओल, बॉबी देओल आणि ईशा देओल ही सावत्र बहिण भाऊ आहेत. असे असले तरी या सर्वांच एकमेकांशी खूप चांगल्या प्रकारे जमत असल्याचे सांगण्यात येते.
2) अर्जुन कपूर, जान्हवी कपूर – अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर हे बॉलिवूडमध्ये आज आघाडीचे कलाकार म्हणून गणल्या जातात. अर्जुन कपूर हा बोनी कपूर याचा पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा आहे. तर बोनी कपूर यांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या सोबत लग्न केले होते. श्रीदेवी यांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या मुली आहेत. नात्याने अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर व खुशी कपूर हे सावत्र बहिण भाऊ आहेत. असे असले तरी या सर्वांचे खूप चांगल्या प्रकारे जमत असल्याचे सांगण्यात येते.
3) शाहिद कपूर, इशान खट्टर – शाहिद कपूर हा आपल्याला माहीतच आहे. शाहिद कपूर याला सावत्र भाऊ ईशान खट्टर हा आहे. शाहिद कपूरचे वडील पंकज कपूर यांनी दोन लग्न केले आहेत. पहिल्या पत्नीपासून त्यांना इशान खट्टर आणि सना कपूर ही मुलं आहेत.
तर त्यांनी सुप्रिया पाठक यांच्या सोबत देखील लग्न केले आहे. सुप्रिया पाठक पासून त्यांना शाहिद कपूर हा मुलगा आहे. या सर्वांचे खूप चांगल्या प्रकारे जमत असल्याचे सांगण्यात येते.
4) आलिया भट्ट-पूजा भट्ट- आलिया भट्ट, पूजा भट्ट या सावत्र बहिणी आहेत. आलिया भट हीला सावत्र भाऊ आहे. त्याचे नाव राहुल आहे महेश भट्ट यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये दोन लग्न केले आहेत. पहिल्या पत्नीपासून त्यांना पूजा भट, राहुल ही मुले आहेत.
तर त्यांनी दुसरे लग्न सोनी रजदन यांच्यासोबत केल आहे. सोनी पासून महेश यांना आलिया भट ही मुलगी आहे. या सगळ्यांच खूप चांगल्या प्रकारे जमत असल्याचे सांगण्यात येते.
5) सारा अली खान, तैमूर खान– सारा अली खान आणि तैमूर अली खान हे देखील सावत्र बहिण भाऊ आहेत. सैफ अली खान याने त्याच्या आयुष्यात दोन लग्न केले.पहिली पत्नी अमृता सिंह यांच्यापासून सैफ अली खान हा सारा अली खान व इब्राहिम खान ही मुल आहेत.
तर दुसरे लग्न त्याने करीना कपूर सोबत केल आहे. करीना कपूर हिला तैमूर हा मुलगा आहे.आणि दुसरा एक मुलगा आहे. या सर्वांचे खूप चांगल्या प्रकारे जमत असल्याचे सांगण्यात येते.