भारतीय चित्रपटसृष्टीत ‘चांदनी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. तीच्या चमकदार अभिनयामुळे चित्रपट उद्योगाला नवी ओळख मिळाली. 1975 चा हिट चित्रपट ‘ज्युली’ मधून तिने बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. श्रीदेवीने हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे.
पण फार कमी लोकांना माहीत आहे की श्रीदेवीने तिच्या कारकिर्दीची सुरुवात वयाच्या फक्त 4 व्या वर्षी केली होती. एवढेच नाही तर, एक काळ असा होता जेव्हा श्रीदेवीने इतर कलाकारांपेक्षा जास्त शुल्क आकारण्यास सुरुवात केली होती. चर्चा 1960 मध्ये बालाचंदर दिग्दर्शित ‘मंदरू मुदिचू’ या चित्रपटाची आहे. जेव्हा श्रीदेवीने लहान वय असूनही एका प्रौढ स्त्रीची भूमिका साकारली होती.
त्यावेळी श्रीदेवी अवघ्या 13 वर्षांची होती आणि तिने चित्रपटात श्री अम्मा यांगर अय्यप्पन नावाच्या विवाहित महिलेची भूमिका साकारली होती. हा चित्रपट करताना रजनीकांत 25 वर्षांचा होता आणि श्रीदेवी 13 वर्षांची होती. चित्रपटात श्रीदेवी ने वयाच्या 13 व्या वर्षी रजनीकांतच्या सावत्र आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी श्रीदेवीने रजनीकांतपेक्षा जास्त फीस घेतली होती.
श्रीदेवीला चित्रपटासाठी 5000 रुपये मिळाले तर रजनीकांतला 2000 रुपये मिळाले होते. ही फिस त्या काळात खूप जास्त होती. या चित्रपटानंतर श्रीदेवी आणि रजनीकांत यांच्यात चांगली मैत्री झाली आणि त्यांनी 20 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. असे म्हटले जाते की जेव्हा राणा चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रजनीकांतची तब्येत बिघडली तेव्हा श्रीदेवींनेे त्याच्यासाठी व्रत ठेवले होते.