अभिनेत्री प्रिया बापटच्या बहिणीला पाहिलंत का?, तिच्याइतकीच दिसायला आहे ग्लॅमरस तसेच तिचादेखील आहे सिनेइंडस्ट्रीशी संबंध

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट हिने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. प्रिया इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते आणि बऱ्याचदा ती फोटोंमुळे चर्चेत येत असते. तिची स्टाईल स्टेटमेंट तरूणींना चांगलीच भुरळ पाडली आहे.

फार कमी लोकांना माहित आहे की, प्रिया बापटला सख्खी बहिण आहे जिचे नाव श्वेता आहे. तिचा देखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे.प्रिया बापटची सख्खी बहिण श्वेता बापट सेलिब्रेटी स्टायलिस्ट आणि कॉश्च्युम डिझायनर आहे. प्रिया बापटचीदेखील तिच स्टायलिस्ट आहे. प्रिया शिवाय ती बरेच सेलिब्रेटींसाठी स्टायलिस्ट म्हणून काम करते.

याशिवाय प्रिया आणि श्वेताचा सावेंची हा साडीचा ब्रॅण्ड आहे. त्यांचे सोशल मीडियावर अधिकृत पेजदेखील आहे. या अकाउंटवर साड्यांचे कलेक्शन पहायला मिळते. प्रिया आणि श्वेता या दोघी बहिणींमध्ये खूप चांगले बॉण्डिंग आहे.प्रिया बापटच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नुकतीच तिची आगामी लोकप्रिय वेबसीरिज सिटी ऑफ ड्रिम्सच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

३० जुलैला ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये राजकीय नाट्य पहायला मिळणार असून प्रियाने यात पौर्णिमा गायकवाडची भूमिका साकारली आहे.या शिवाय तिची उमेश कामतसोबत लोकप्रिय सीरिज आणि काय हवेचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज पण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ती पॉण्डिचेरी चित्रपटात दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.