खऱ्या प्रेमाच्या शोधात आयुष्यभर अविवाहितच राहिल्या या सुंदर अभिनेत्र्या.. आता म्हणतायत अनेक ईच्छा राहिल्या अतृप्त..

प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याने लवकरात लवकर लग्न करून कौटुंबिक जीवनाची सुरुवात करावी. अनेक जण प्रेमाच्या बंधनात अडकतात आणि पुढे त्याच व्यक्ती सोबत विवाह करून संसार थाटतात. परंतु सर्वांच्याच नशिबी हे सुख असतेच असे नाही. बर्‍याच वेळा एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर लोक प्रेम करून बसतात आणि मग त्याच व्यक्तीसोबत लग्न करायच्या आग्रहामुळे ते अविवाहित राहण्याची देखील वेळ येऊ शकते.

त्याच वेळी, असे काही लोक आहेत जे लग्नासाठी त्यांच्या खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात, परंतु त्यांचा शोध कधीच पूर्ण होत नाही. आणि मग मनासारखा जोडीदार न मिळाल्याने त्यांना अविवाहित आयुष्य व्यतीत करावं लागतं. अशा लोकांचं लग्न करून छानसं कुटुंब सुरू करण्याचं स्वप्न अधुरेच राहते.

सर्वसामान्य व्यक्तीच नव्हे तर बॉलिवूड मध्ये देखील असे अनेक कलाकार आहेत जे खऱ्या प्रेमाच्या शोधात राहिले आणि आता अविवाहित जीवन जगतायत. आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचं नाव अनेकांसोबत जोडलं गेलं परंतु त्या अजूनही अविवाहितच राहिल्या.

परवीन बाबी: 70 आणि 80 च्या दशकात तिच्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर सर्वांचे हृदय जिंकणारी परवीन बाबी शेवटच्या क्षणापर्यंत एकटी राहिली. परवीनच्या आयुष्यात तीन दिग्गज कलाकार लोक आले. पण दुर्दैवाने परवीनला या तिघांपैकी कोणासोबतही लग्न करता आले नाही. सुरुवातीला परवीन अभिनेता डॅनीच्या प्रेमात होती पण हे संबंध फार काळ टिकू शकले नाहीत.

मग कबीर बेदी तिच्या आयुष्यात आले पण पत्नी व मुले यांच्यामुळे त्यांना देखील परवीनपासून दूर रहावे लागले. नंतर दिग्दर्शक महेश भट्ट तिच्या प्रेमात पडले. पण शेवटी महेश भट्टनेही दुसऱ्याच व्यक्तीसोबत लग्न करून परवीनचे मन दुखावले. हे दोघेही 3 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र होते. मात्र, नंतर महेशलाही पत्नी आणि मुलीमुळे परवीन सोडून जावे लागले.

महेश भट्ट यांच्या निघून जाण्याच्या दु: खामध्ये परवीन खूप तणावग्रस्त झाली. तीला पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया नावाचा धोकादायक आजार झाला ज्यामुळे तीची प्रकृती खालावत गेली. त्यानंतर 20 जानेवारी 2005 रोजी परवीन तिच्या फ्लॅटमध्ये रहस्यमय परिस्थितीत मृ-त अवस्थेत आढळली.

तब्बू: चित्रपटातुन तब्बू म्हणून ओळखल्या जाणार्‍या तबस्सुम फातिमा हाश्मी आता 47 वर्षांची झाली आहे पण अजूनही अविवाहित आहे. तब्बूचे लव्ह अफेअर अनेक अभिनेत्यांसमवेत असले तरी तिचे नाव अभिनेता नागार्जुनशी सर्वाधिक काळासाठी जोडले गेले होते. तब्बूचे नागार्जुनवर खूप प्रेम होते परंतु त्याचे लग्न आधीच झालेले होते, त्यामुळे आपल्या पत्नीच्या दबावामुळे त्याने तब्बूला सोडावं लागलं.

‘गोलमाल अगेन’ चित्रपटाच्या रिलीजच्या वेळी एका पत्रकाराने तब्बू ला अविवाहित राहण्यामागचे कारण विचारले असता तिने मजेत म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा जेव्हा एखादा मुलगा तिच्या जवळ येतो तेव्हा अजय देवगन आणि तिचा चुलत भाऊ हे त्याला तिच्यपासून दूर नेतात. यामुळे आजपर्यंत ती अविवाहित राहिली आहे.

सुष्मीता सेन : एकेकाळी मिस युनिव्हर्स राहिलेली अभिनेत्री सुष्मिता सेन यांचे नाव रणदीप हूडा, इम्तियाज खत्री, बंटी सचदेव, अनिल अंबानी आणि वसीम अक्रम यांच्यासह अनेक लोकांशी जोडले गेले होते. परंतु असे असूनही, ती आजपर्यंत अविवाहित आहे. सध्या ती दिल्ली स्थित मॉडेल रोहमन शौल सोबत डेटिंग करत आहे जो तिच्यापेक्षा सुमारे 15 वर्षांनी लहान आहे.

सुरैया: गत जमान्यातील अभिनेत्री सुरैया तेव्हाच सुपरस्टार देव आनंद च्या प्रेमात पडली होती. ‘जीत’ चित्रपटाच्या सेटवर देवानंदने तिला डायमंडची अंगठी देऊन सुरैयाचा प्रेमाचा प्रस्ताव ही दिला. तथापि हे संबंध सुरैयाच्या आजीला मान्य नव्हते. अशा परिस्थितीत देव आनंदला विसरु न शकल्यामुळे सुरैया आयुष्यभर अविवाहित राहिली.

अमिषा पटेल : अमिषा पटेल सध्या 42 वर्षांची आहे. आणि असे असून सुद्धा ती अविवाहित आहे. तिचे बर्‍याच लोकांशी प्रेमसंबंधही होते, त्यात विक्रम भट्ट सोबतच्या तिच्या अफेअरची खूप चर्चा होती. परंतु आजही ती खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.