स्वतःची मुलं घरात लग्नाची असताना ही अभिनेत्री आता स्वतः चढतेय बोहल्यावर.. 18 वर्षांपूर्वी घेतला होता घ’टस्फो’ट..

कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री उर्वशी ढोलकिया सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमीच तिचे निरनिराळ्या अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. ती तिचे बोल्ड फोटोही चाहत्यांसोबत शेअर करत असते. याशिवाय उर्वशी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही सोशल मीडियावर चर्चेत असते

उर्वशीने खूप कमी वयात लग्न केलं होतं. त्यानंतर तिला दोन मुलं झाली. परंतु, काही कारणामुळे तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिने एकटीने तिच्या दोन्ही मुलांचं पालनपोषण केलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या आयुष्याबद्दल आणखीही काही खुलासे केले.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उर्वशीने तिच्या आयुष्याबद्दल सांगताना म्हटलं, ‘मला कधी रिलेशनशिपबद्दल विचार करायला वेळ नाही मिळाला. मी नेहमी कामात व्यग्र होते आणि मला वाटत होतं की माझ्या मुलांना चांगल्या शिक्षणासोबत आरामदायी आयुष्यदेखील मिळेल.

मला वाटतं कोणत्याही नात्यात असण्यासाठी आधी त्या नात्याचं अस्तित्व आणि तुमचा सहजपणा गरजेचा आहे. जर एखाद्या नात्यासाठी तुम्हाला स्वतःला बदलावं लागत असेल तर तर त्या नात्याचा काहीही अर्थ नाही.’

मुलांबाबत बोलताना उर्वशीने म्हटलं, ‘माझी मुलं आणि माझं कुटुंब माझं पुन्हा लग्न लावण्याबद्दल विचार करतायत. पण मी याबद्दल कधीही गंभीरपणे विचार नाही केला. माझी मुलं मला नेहमीच लग्न करण्याचा किंवा कोणालातरी डेट करण्याचा सल्ला देतात. जेव्हा हे मुद्दे माझ्या समोर येतात तेव्हा मी जोरजोरात हसू लागते.

काय विचार करू मी? असं नाहीये की माझं वय निघून गेलंय पण एक वेळ अशी येते जेव्हा त्या पलीकडे मी एखाद्या विषयावर जास्त विचार नाही करू शकत. दुसरी गोष्ट म्हणजे मी एक आत्मनिर्भर महिला आहे आणि मी माझ्या अटींवर जीवन जगते. म्हणून मला वाटतं की कोणीतरी अशी व्यक्ती हवी जी मला समजून घेईल.’ उर्वशी काही वर्षांपूर्वी अभिनेता अनुज सचदेवाला डेट करत होती परंतु, काही वर्षांनी त्यांचा ब्रेकअप झाला होता.

उर्वशी अनुजसोबत नात्यात असल्याची मीडियात अनेकवेळा चर्चा होत होती. पण त्या दोघांनी त्यांच्या नात्याबाबत मीडियात काहीही न बोलणेच पसंत केले होते. त्या दोघांना अनेकवेळा एकत्र पाहाण्यात येत असे. ते दोघे लग्न करतील असे वाटत असतानाच त्या दोघांचे ब्रेकअप झाले. अनुजपेक्षा उर्वशी मोठी असल्याने आणि त्यातही तिला दोन मुले असल्याने अनुजची आई या नात्यासाठी तयार नव्हती असे म्हटले जाते.

उर्वशी आणि अनुज यांचे ब्रेकअप झाल्यानंतर अनेक महिन्यानंतर स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत उर्वशीने सांगितले होते की, मला या नात्याबद्दल कधीच बोलायचे नव्हते. मी माझ्या खाजगी आयुष्याविषयी कधीही न बोलणेच पसंत करते. पण आता मी अनेक महिन्यांनी सांगत आहे की, आम्ही दोघे नात्यात होतो.

Leave a Reply

Your email address will not be published.